मुंबई(अजित जगताप) : दिवाळीपूर्वी दसरा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होतो याच दिवशी छत्रपतींच्या राजधानी मध्ये शाही दसरा महोत्सव होतो. त्याला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळवण्यासाठी सातारकर मावळे आक्रमक झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
सातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा देण्याबाबत सातारा जिल्ह्यातील आ. भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, आ. महेश शिंदे यांनी महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी पत्र सादर केले आहे. हे पत्र घेऊन महायुतीचे सातारा जिल्हा समन्व्यक श्री. सुनिल काटकर , काका धुमाळ, चिन्मय कुलकर्णी यांनी आज मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना भेट घेतली . या पत्राचे अवलोकन करून शाही दसरा महोत्सवास तात्काळ राज्य महोत्सव दर्जा देण्याची ग्वाही दिली.
राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री शंभूराज देसाई यांनी सातारा शहरात होणाऱ्या शाही दसरा महोत्सवास पर्यटन व जिल्हा नियोजन मधून भरीव निधी देण्याची ग्वाही दिली आहे.या कामी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे , मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी ही या मागणीला जाहीर पाठिंबा दिला आहे. . आज सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने सातारकरांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवले आहे. यावेळी युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण जंगम, तेजस जगताप,प्रथमेश इनामदार, रविंद्र लाहोटी, प्रवीण कणसे उपस्थित होते.
—— ——– ——– ——- ——- —–
फोटो — शाही दसरा महोत्सवाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची शिष्टमंडळाने भेट घेतली.( छाया– निनाद जगताप मुंबई)