Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रएसटी बस चालक वाहकांना विश्रांती कक्ष

एसटी बस चालक वाहकांना विश्रांती कक्ष

मुंबई : एसटी बस चालक वाहकांना विश्रांती करण्यासाठी आता थंडगार वातानुकूलीत विश्रामकक्ष उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील राज्यातील पहिल्या वातानुकुलीत चालक- वाहक विश्रांती कक्षाचे उद्घाटन झाले.

यावेळी मुंबईचे पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर व एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या निधी द्वारे राज्यातील वेगवेगळ्या आगारातून बसेस घेऊन येणाऱ्या सुमारे ३०० चालक- वाहकांसाठी तसेच मुंबई आगारातील १०० चालक – वाहकांच्यासाठी सुमारे ९० लाख रुपये खर्चून वातानुकुलीत ३ अत्याधुनिक विश्रांती कक्ष बांधण्यात आले आहेत.

या विश्रांती कक्षांमध्ये टू टिअर बॅक बेड सह, करमणूक कक्ष, जेवणासाठी स्वतंत्र हॉल , स्वच्छ व टापटीप अशी प्रसाधनगृहे निर्माण करण्यात आली आहेत.
अशाच प्रकारचे वातानुकूलित विश्रांती कक्ष परळ, कुर्ला नेहरूनगर ,बोरवली नॅन्सी कॉलनी येथील आगारात तयार करण्यात येणार असून ठाण्यातील खोपट बस स्थानका वर दुसरे वातानुकूलित कक्ष बांधून तयार झाले आहे. त्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments