Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रकला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे पारस बालभवनात रक्षाबंधन सोहळा मोठ्या...

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे पारस बालभवनात रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्सवात साजरा

मुंबई (शांताराम गुडेकर) : मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी. के. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीच्या संस्थाचालक श्रीमती कविता शिकतोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनातून बालभवन शैक्षणिक पुनर्वसन निवासी वसतीगृह टिटवाळा,म्हसकळ येथे रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला.बहिण भावाचे पवित्र प्रेम रक्षाबंधन या कार्यक्रमातून पहायला मिळाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. प्रशांत तांदळे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. शफीक शेख सर इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. श्री. दिनेश घरत सर, प्रा . महेश कांबळे सर, प्रा. रसिका लोकरे, प्रा. रिया बांगर या शिक्षकांनी अतिशय शिस्तबद्ध व उत्साहाने कार्यक्रम पार पाडला.
कार्यक्रमात सर्वप्रथम माई सौ. संगीता गुंजाळ यांचा पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालया मार्फत सत्कार स्वागत करण्यात आला.कार्यक्रमाची प्रस्तावना श्री .घरात सर यांनी केली. माणुसकी बघितली तर दिसते ,मानली तर मिळते व ओळखली तर शेवटपर्यंत राहते असे प्रतिपादन सौ. संगीता गुंजाळ(माई) यांनी पारस बाल भवनाची माहिती देताना आपल्या भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रमास कु.अनुष्का, साक्षी, कृतिका ,रूपाली,अलबीना ,जस्सीका ,श्वेता, ऋतिका,ज्योती ,दिव्या ,मयुरी, सारिका, प्रणिता , निकिता, सुष्मिता इत्यादी विद्यार्थिनींनी महाविद्यालयात स्वता राख्या बनविल्या व बालभवन मधील मुलांना त्या राख्या बांधल्या. याप्रसंगी बालभवन मधील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागस भाव व आनंद झळकलेला पाहून सर्वांचं मन भरून आलं. मुलं इतकी खुश होती की त्यांनी एक सुरात अनेक गीते सादर केली.या कार्यक्रमाचा समारोप सौ. रसिका लोकरे यांच्या मनोगताने करण्यात आला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments