कोकण (मोहन कदम) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहर पासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु.बोंड्ये येथील प्राथमिक शिक्षिका सौ.रुणाली राजाराम तोरस्कर या २९ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेण्यात आली.त्याबद्दल त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राधा गोविंद फाऊंडेशन यांच्यावतीने मानपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान सोहळा शनिवार दि.२० सप्टेंबर २०२५ रोजी नृसिंह मंगल कार्यालय, देवरूख येथे थाटामाटात पार पडला.या भव्य समारंभात राधा गोविंद फाऊंडेशनच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा सौ. पूजाताई निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सौ.तोरस्कर या संगमेश्वर तालुक्यातील मु. पो. कासार कोळवण येथील रहिवाशी असून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत समाजमनानेही त्यांचे कौतुक केले आहे.या सन्मानानंतर राष्ट्रवादी तालुका अध्यक्षा व कासार कोळवण गावच्या सरपंच सौ.मानसी करंबेळे तसेच उपसरपंच प्रकाश तोरस्कर व गावचे पोलीस पाटील महेंद्र करंबेळे,बोंड्ये शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद,पंचक्रोशीतील अनेक मान्यवर आणि त्यांचा शिक्षक मित्र परिवार व विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार मंडळी यांनी त्यांचे अभिनंदन करून मनःपूर्वक पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सौ.तोरस्कर यांनी, “हा सन्मान माझ्या विद्यार्थ्यांसाठी व शिक्षण सेवेसाठी आहे,” अशी भावना व्यक्त केली. जि प शाळा बोंडये येथे कार्यरत असलेल्या विविध कलागुणसंपन्न,उत्तम सामाजिक संघटन व अध्यापन कौशल्यप्राप्त आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका आदरणीय सौ.रुणाली तोरस्कर यांना संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (महिला) यांच्या वतीने मान सौ.पूजा शेखर निकम यांच्या उपस्थितीत “नवदुर्गा” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागातल्या अत्यंत तळमळीने कार्य करणाऱ्या एका हाडाच्या शिक्षिकेचा हा गौरव मनाला खूप आनंद देणारा आहे अशा प्रतिक्रिया यानिमित्ताने अनेकांनी व्यक्त करत आनंद व्यक्त केला.
प्राथमिक शिक्षिका सौ.रुणाली राजाराम तोरस्कर यांचा “सन्मान नवदुर्गा”मानपत्र देऊन गौरव
RELATED ARTICLES