Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रतापोळा विभागातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची पाहणी होणार ; समाजसेवक धोंडीबा धनावडे व...

तापोळा विभागातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची पाहणी होणार ; समाजसेवक धोंडीबा धनावडे व ग्रामस्थ यांच्या आमरण उपोषण लढ्याला यश

प्रतिनिधी (भीमराव धुळप) :

तापोळा विभागातील समाजसेवक धोंडीबा धनावडे व ग्रामस्थ यांनी कॉन्ट्रॅक्टर (ठेकेदार) यांच्याविरुद्ध तापोळा विभागातील रस्त्याच्या कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याबद्दल मागील काही दिवसापासून उपोषण चालु केले होते. त्याला मंगळवारी ११ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी स्वतः येऊन लिखित स्वरूपात देऊन उपोषण मागे घेण्यास विनंती केली आणि झालेल्या कामांचे स्वतः ऑडिट करून सदर कॉन्ट्रॅक्टरवर (ठेकेदार) कारवाई करू अशी लेखी दिले आहे. त्यामूळे किमान भागातील येथून पुढची कामे निदान उत्कृष्ट दर्जाची होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सविस्तर वृत्तात, महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा विभाग कोयना तसेच इतर गावामधील विकास कामाबाबत करत असलेल्या आमरण उपोषणाबाबत आपल्यासोबत ११ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथील उपोषण स्थळी आपल्याशी झालेले समक्ष चर्चेनुसार महाबळेश्वर तालुक्यातील मोजे खरोशी व शिरनार येथील झालेल्या रस्त्यांच्या कामाची गुरुवार १३ फेब्रुवारी २०२५ रोजी आपण व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत एकत्रित पाहणी करण्याचे ठरले असून खराब झालेले काम काढून नव्याने चांगल्या दर्जाचे काम करून देण्याची हमी देत आहे. असे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता,महाबळेश्वर यांनी लेखी आदेश दिले असून प्रशासनाने तापोळा विभागातील सामाजिक कार्यकर्ते धोंडिबा धनावडे आणि ग्रामस्थ यांना आदेश पत्र देऊन उपोषण मागे घेण्यास विनंती केली असल्याने कामाची पाहणी करून संबंधित कामे त्वरित नव्याने बनवण्यासाठी आश्र्वासित केले आहे. त्यामुळे तापोळा विभागातील ग्रामस्थांना न्याय मिळाला असल्याने समस्त विभागातील विविध राजकीय पक्ष,संघटना यांनी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते धोंडिबा धनावडे आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments