Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रपंढरीनाथ पवार गंगाई जिवन गौरव पुरस्काराने' सन्मानित मी स्वतःला भाग्यवान समजतो- पवार...

पंढरीनाथ पवार गंगाई जिवन गौरव पुरस्काराने’ सन्मानित मी स्वतःला भाग्यवान समजतो- पवार यांचे गौरवोद्गार

प्रतिनिधी : अण्णाभाऊ साठे जयंती व या जयंतीचे ओचित्य साधून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी माझे घरी येऊन मला त्यांचे आईचे नावे “गंगाई जिवन गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित केले.
त्यांच्या मातोश्री गंगाबाई गायकवाड यांचे प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त एक आगळा वेगळा कार्यक्रम ठेवण्यात आला होता राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली वाबळे पुरोगामी सत्यशोधक विचाराचे किर्तनकार यांचे किर्तन ठेवले व आपल्या मातोश्रीचे नावे “गंगाई जिवन गौरव पुरस्कार” मला देण्याचे ठरविले, हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात नांदेड येथे मे महिन्यात केला,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.बबनराव घोलप व वाबळे माऊली यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता पण माझी तब्येत बरी नसल्याने मी नांदेड येथे जाऊ शकलो नाही तोच पुरस्कार आज माझे घरी येऊन शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले,यावेळी श्री.रमेश घोलप, श्री.सत्यनारायण ऊनवणे,इंजिनिअर श्री विशाल बनसोडे व मुखेड ता.अध्यक्ष श्री.रविराज गंगासागरे नांदेड वरून आले होते

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments