प्रतिनिधी : महाविकास आघाडीतर्फे आज महायुतीने केलेल्या घटनाबाह्य सरकारचा ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी खा. शरद पवार , माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. सुप्रिया सुळे, खा. संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे, खा. वर्षा गायकवाड, खा. अरविंद सावंत, खा. अनिल देसाई उपस्थित होते.
