Monday, September 22, 2025
घरमहाराष्ट्रजागतिक वाहनमुक्त दिनानिमित्त वातावरण फाउंडेशनचा "डबल द बस" अभियानाला पाठिंबा

जागतिक वाहनमुक्त दिनानिमित्त वातावरण फाउंडेशनचा “डबल द बस” अभियानाला पाठिंबा

मुंबई : जागतिक वाहनमुक्त दिनानिमित्त (World Car-Free Day) वातावरण फाउंडेशनने देशव्यापी “डबल द बस” अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला. या दिवशी मुंबईसह नागपूर, पुणे आदी शहरांमध्ये नागरिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी बसस्थानकांवर एकत्र येऊन फलक आणि बॅनरच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीसाठी तातडीने गुंतवणूक करण्याची मागणी केली.

मुंबईत कुरळा बस डेपो आणि चेंबूर लॉ कॉलेज येथे नागरिक संघटनांचे प्रतिनिधी व महाविद्यालयीन विद्यार्थी एकत्र आले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून सार्वजनिक बससेवेचे महत्त्व, वाढती लोकसंख्या, प्रवाशांची गर्दी, वाढलेला प्रवास खर्च आणि अपुऱ्या बसफ्लीटविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.

या अभियानांतर्गत २०३० पर्यंत मुंबईतील बसफ्लीट दुप्पट करण्याची, त्यासाठी वाढीव अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची, तसेच सार्वजनिक बससेवा अधिक आधुनिक, सुरक्षित आणि सर्वांना सहज उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली.

सध्या (मार्च २०२५ पर्यंत) मुंबईकडे केवळ २,७३१ बसेस आहेत — म्हणजेच शहराच्या लोकसंख्येनुसार दर एक लाख लोकांमागे केवळ १५ बसेस उपलब्ध आहेत.

वातावरण फाउंडेशनचे संचालक आणि मुंबईतील “डबल द बस” आंदोलनाचे संयोजक भगवान केसभट यांनी सांगितले,

“मुंबई खरं तर बसवरच चालते. दररोज सुमारे ४५ लाख लोक BEST बससेवेवर अवलंबून आहेत. मात्र, बसफ्लीट वर्षानुवर्षे कमी झाल्याने बसेस ओसंडून वाहतात, प्रवास अविश्वसनीय बनतो. त्यामुळे बसफ्लीट दुप्पट करणे ही चैनीची गोष्ट नसून शहराला गती देण्यासाठीची गरज आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments