Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रहुतात्मा स्मारक तरुणांना प्रेरणा देणारे, मात्र त्याचे‌ ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे! -आमदार...

हुतात्मा स्मारक तरुणांना प्रेरणा देणारे, मात्र त्याचे‌ ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे! -आमदार सचिन अहिर यांचे प्रतिपादन

मुंबई – सन १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणार्पणातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी गवालिया टॅन्क मैदानावर उभे करण्यात आलेले हुतात्मा स्मारक आजच्या तरुणांचे प्रेरणास्थान आहे. परंतु त्याचे महत्व कायम राहणार का, हा आज खरा मूलभूत प्रश्न आहे, असे विचार राष्ट्रीय मिल मंजूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी येथे बोलताना काढले.आजचा क्रांतीदिन ऐतिहासिक मानला जातो. गवालिया टॅंक मैदानावरील व्यवस्थे‌‌वर लोकांनी व्यक्त केलेल्या नापसंतीवर ते म्हणाले,या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व कायम राहिले पाहिजे.
आज क्रांतीदिनाच्या औचित्याने राष्ट्रीय मिल‌‌ मजदूर संघ, गिरणी कामगार संयुक्त लढा समिती‌ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ,रामिम संघ सेवादल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांची रॅली आयोजित करण्यात आली होती.
गिरणी कामगारांची अभिवादन रॅली नाना चौक,अग्निशमनकेंद्र येथून गवालिया टॅंक मैदानापर्यंत आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचे नेतृत्व अध्यक्ष आणि संयुक्त लढा समितीचे प्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर, संघटनेचे सरचिटणीस, लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते यांनी‌ केले .खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर यांनीही‌ नेतृत्वात सहभाग घेतला.उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी निवेदन केले.
याप्रसंगी सर्व श्रमिक संघाचे कॉ.विजय कुलकर्णी, गिरणी कामगार सेनेचे बाळ खवणेकर,संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे रमाकांत बने, विवेकानंद बेलूसे, एनटीसी कामगार असोसिएशनचे बबन मोरे, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे आनंद मोरे, मुंबई गिरणी कामगार युनियनचे ऍड.अरुण निंबाळकर, ओला उबेरचे नेते सुनिल बोरकर, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे राजेंद्र साळसकर,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उत्तम गिते,माजी नगरसेवक सुनिल अहिर, शिवाजी काळे, किशोर राहटे आदी कामगार नेते उपस्थित होते. कामगार संघटना संयुक्त कृती लढा समितीच्या अन्य सर्व कामगार संघटनांनी या अभिवादन सोहळ्याला आपला पाठिंबा दिला होता.
राष्ट्रीय मिल मजूर संघ गेली ३४ वर्षे राष्ट्रीयभावनेने हा अभिवादनाचा सोहळा आयोजित करीत आहेत, असे सांगून आमदार सचिन अहिर यावेळी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, कामगारांचा असेल किंवा सामाजिक प्रश्न असेल,सरकार निर्णय घेण्यास अकारण वेळ लावीत‌ आहे. अध्यक्ष आमदार सचिन आहिर‌, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी क्रांतीदिनाच्या औचित्याने गवालिया टॅन्क मैदानावरील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून स्वातंत्र्य लढ्यातील योद्धयांना अभिवादन केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments