नारायण आठवले पुरस्कार शुभदा चौकर यांना जाहीर
मुंबई : गोव्यातील ‘लोकविश्वास प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा यंदाचा ‘नारायण आठवले स्मृती पुरस्कार’ शुभदा चौकर यांना जाहीर झाला असून तो रविवारी, २८ एप्रिल ला मुंबईत प्रदान केला जाणार आहे. ज्येष्ठ संपादक आणि लेखक नारायण आठवले यांनी विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या लोकविश्वास प्रतिष्ठानची स्थापना गोव्यात केली होती. त्यांच्या निधनानंतर संस्थेने आठवले यांच्या नावाने पत्रकारितेचा पुरस्कार सुरू केला आहे. तो ‘वयम’च्या संपादक शुभदा चौकर यांना रविवारी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर व ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे प्रदान केला जाणार आहे.