प्रतिनिधी : आज जगभरात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मोठ्या थाटामाटात जयंतीचा जल्लोष सुरू असताना, संविधानाचा भक्कम आधार असलेल्या भारतीय लोकशाहीचा ‘जागर’ आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंतीचा संगीतिक सोहळा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने मोठ्या दिमाखात दि.20एप्रिल 2025 रोजी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित केला होता.आपले शब्द ही थिटे पडावेत किंवा विशेषने गळून पडावी असा भीम गीतांचा मंगलमय आणि श्रवणीय कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला होता.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ‘संविधानाचा अमृत महोत्सव’ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्ताने ‘जागर संविधानाचा गौरव विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांचा’हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने घेतला होता.मुंबईच्या दक्षिण भागातील अतिमहत्वाचे ठिकाण असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या मैदानात हा कार्यक्रम घेणे म्हणजे खूप बाबींचा विचार करावा लागतो.कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, महत्वाच्या व्यक्तीची आसन व्यवस्था, रंगमंच सजावटीचे नियोजन,प्रमुख पाहुण्यांचा राजशिष्टाचार, आयत्या वेळी आलेल्या लोकांची बसण्याची आसन व्यवस्था,जयंतीला साजेल असा सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करणे खुप जिगरीचे असते.मात्र या सर्व अल्पकालावधीत नियोजन करण्याच्या अग्नी परिक्षेत सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी जणू काय पास झाले.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे हे तर पायाला भिंगरी लावून कार्यक्रमाचे नियोजन करीत होते. शुक्रवार आणि शनिवारी सुट्टीचे दिवस असतानाही अधिकारी धावपळ करीत होते. कार्यक्रमाच्या एक दिवस आगोदर तर चक्क पहाटे चार वाजेपर्यंत गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमा स्थळी अगदी खुर्च्या मोजण्यापासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कुठे आणि कशी लावावी.रंगमंचावरील सजावट कोणत्या पद्धतीने झाली पाहिजे,याची बारीक सारिक काळजी संचालक चवरे यांनी घेतली होती. हाताखाली दहाबारा अधिकारी असताना ही एखाद्या अधिकाऱ्यांने स्वतःला झोकून देवून काम करणे,हे किती कौतुकास्पद आहे.हे शब्दात सांगणे कठीण आहे.कारण कार्यक्रमाला कुठेही सामाजिक गालबोट लागू नये.याची चिंता कदाचित त्यांना असूही शकते.
संचालनालयाचे प्रमुख म्हणून जशी संचालक चवरे यांनी जबाबदारी उचलली होती. तशी त्यांच्या मागे धावपळ करणाऱ्या अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली.ते नाकारून चालणार नाही. संचालनालयाचे वरिष्ठ अधिकार संदिप शेंडे,संदिप बलखंडे यांच्या सह इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भरपूर मेहनत घेतली.रंगमंचावर आलेला प्रत्येक कलावंत हा नावाजलेले होता.त्यामुळे त्यांना न दुखवता त्यांचा सन्मान करणे,कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित रहावी म्हणून पोलिसांशी समन्वय ठेवणे,गर्दी वाढली तर आसन व्यवस्था कशी निर्माण करायची.याची सर्व सुबद्धता या सोहळ्यात करण्यात आली होती.संदिप शेंडे आणि संदिप बलखंडे यांनी या जयंतीच्या नियोजनासाठी झोकून केलेले काम म्हणजे “येथे पाहिजे जातीचे…….! असेच म्हणावे लागेल.
सायंकाळी सहा वाजल्यानंतर विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला आणि आयोजित केलेल्या सांगीतिक कार्यक्रम बघायला आंबेडकरी अनुयांची गर्दी ओसंडून वाहत होती.महाराष्ट्राचे महागायक आदर्श शिंदे,मिलिंद शिंदे,सुरेश वाडकर, नंदेश उमप, शाहिर राजा कांबळे,अवधूत गुप्ते,वैशाली सामंत,उर्मिला धनगर,या सेलिब्रेटीने तर अक्षरशः रंगमंच दणाणून सोडला होता. या महान गायकांनी महामानवाच्या जीवनावर-कार्यावर प्रकाश टाकणारी गीतं गायली. भीम गीतांची जसं – जशी रंगत वाढत गेली,तसं तशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची घोषणा आणि जयभीमचा नारा दिल्यावर जीवनाला उभारी,तेज,शक्ती मिळते.अगदी तसेच वातावरण कार्यक्रमा स्थळी निर्माण झाले होते.तरुणांई आणि अबालवृद्ध भीम गीतांच्या ठेक्यावर नृत्य करून उस्फुर्त जल्लोष करताना दिसत होता. यावेळी बाबासाहेबांचे प्रत्येक गीत चराचरात प्रफुल्लित करीत होते.कार्यक्रमाला शेवट पर्यत असलेली गर्दी जणू काय महासागराला आलेली आनंदाची भरती वाटत होती.इतका अत्युच कार्यक्रम साजरा झाला.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने पहिल्यादा शासकीय चौकटीच्या बाहेर जावून सांस्कृतिक कार्यक्रमात अमूलाग्र बदल केला.ही बाब वाखण्याजोगी होती.
लोकशाहीर नंदेश उमप यांनी कार्यक्रमाच्या शेवटी तर संपूर्ण तरुणाईला आपल्याला पंजाबी भांगड्याचा बाज असणाऱ्या नृत्यावर थिरकायला लावले. विशेष म्हणजे येवढ्या आवाढव्य रंगमंचावर आमचे लोकशाहीर राजा कांबळे यांच्या शाहिरीला जनसमुदायाने उभे राहून जोरदार साद दिलीच, पण भरभरून टाळ्या वाजवून उत्तम प्रतिसाद दिल्या.हे या सोहळ्याचे विलक्षण होते.
अमेरिका आणि युरोपमधील विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चर्चा सत्र आयोजित करणार अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी डॉ.आंबेडकर यांना वैचारिक मानवंदना दिली.
सांस्कृतिक संचालनालयाने हा आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे “सांस्कृतिक एकात्मता आणि सांस्कृतिक समरसता”दाखविणारा होता.हे मात्र निश्चित.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे, सांस्कृतिक एकात्मता आणि सांस्कृतिक समरसता
RELATED ARTICLES