प्रतिनिधी : राज्यात नांदेड, लातूर, धाराशीवसह सोलापूर जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह तर काही ठिकाणी गारपीटही झाली. नांदेड शहर आणि परिसरात आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सोसाट्याच्या वारा सुटल्याने धुळीचे वादळ उठले त्यानंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरूवात झाली. लातूर जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट ही झाली आहे. लातूर तालुक्यातील खोपेगव परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आल्याने अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव गरोळगी किनी या दोन गावांची वाहतूक बंद झाली. लातूर शहर आणि परिसरात दुपारी वातावरणात बदल झाला. त्यानंतर वादळी वारे आणि मुसळधार अवकाळी पावसाने लातूर शहर आणि परिसराला झोडपून काढले. धाराशीव जिल्ह्याच्या काही भागांतही पाऊस झाला. तुळजापूर तालुक्याच्या काही भागात व तुळजापूर शहरामध्येही जोरदार पाऊस झाला.
मराठवाड्यात अवकाळी वादळी पाऊस
RELATED ARTICLES