Sunday, April 20, 2025
घरमहाराष्ट्रऔद्योगिक वसाहतीमध्ये श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले नागरी सत्कार

औद्योगिक वसाहतीमध्ये श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले नागरी सत्कार

प्रतिनिधी : ओगलेवाडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी व्यासपीठावरती श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना मानाचा मुजरा करून त्यांच्या विजयमुद्राची खात्री पटवून दिली. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक सचिन कलबुर्गे, साजिद पटेल, शिंदे मामा, श्रीकांत गुलबर्गे, अमोल कलबर्गे व ओगलेवाडी परिसरातील शेकडो महिला व पुरुष कामगार मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाला सहभागी झाले होते. युवा नेते रामकृष्ण वेताळ यांनी प्रास्ताविक केले .खटाव, पाटण परिसरातील कर्मचारी वर्ग उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय विविध योजना राबवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जातील. सातारा जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहत उत्तमरीत्या चालावी .त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळावा. यासाठी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे निश्चितच पाठपुरावा करतील अशी उद्योजकांनी ग्वाही दिली. यावेळी सागर शिवदास, चंद्रकांत मदने मनोज दादा घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केले. छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय असो अशी घोषणा कामगारांनी दिली

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments