प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिका महापालिका जी उत्तर विभाग आणि स्वीप या अशासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दादर -माहीम रेतीबंदर समुद्र कीनार्यावर स्वच्छता अभियाना सोबत सार्वत्रिक निवडणूका २०२४ मध्ये नागरिकांनी सहभागी होऊन मतदान करण्याच्या आवाहन करुन नागरिकांमध्ये प्रबोधन अभियान तसेच जनजागृती मोहीम शुक्रवार (१९ एप्रिल) घेण्यात आली.
या जनजागृती मोहीमेत ५०० स्थानिक नागरिक, घकव्य खात्यातील कामगार, कर्मचारी, जेएस, पर्यवेक्षक श्री राजेश भावसार,समुप हेमंत घाटगे, सहाय्यक अभियंता श्री ईरफान काझी सर इत्यादींनी सहभाग घेतला होता.
नागरिंकाव्यतिरीक्त अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी,तसेच स्थानिक प्रगत परिसर व्यवस्थापन (ALM) चे सर्व सदस्यांनी या जनजागृती मोहीमेत सहभाग घेतला होता.
या स्वच्छता मोहीमेचे आणि मतदान करण्याच्या जनजागृती मोहीमेचे नेतृत्व सहाय्यक अभियंता ईरफान काझी, व्यवस्थापन समुप हेमंत घाटगे,
पर्यवेक्षक राजेश भावसर, जेएस श्रीम.स्वाती केदारे, निर्मला विरास, निंला सोलंकी, सिध्दी टिबे, राधीका आहीरे, सर्वश्री विजय कांबळे, संदेश मटकर, प्रशांत सवाखंडे,प्रशांत आचरेकर, आर.बी.सावंत, आणि शामजी परमार यांनी केले होते.
या जनजागृती मोहीमेत सर्वांनी सहभाग घेतल्यामुळे सर्वं नागरिकांचे अभिनंदन करण्यात आले व जी-उत्तर विभागाच्या वतीने त्यांना धन्यवाद दिले.
