प्रतिनिधी : उन्हाळा म्हटलं की कलिंगड आलंच. कलिंगड घेताना ते लाल, रसाळ, गोड असेल की नाही असा प्रश्न पडतो. मग आपण ते कलिंगड विक्रेत्याकडून कापून घेतो. ते लालभडक दिसलं की आपण चांगलं म्हणून खरेदी करतो.
पण कलिंगडामध्ये एक केमिकल इंजेक्शननं टाकलं जातं. एरिथ्रोसिन बी नावाचं हे केमिकल, जो एक डाय आहे. ज्याचा वापर कलिंगड पिकवण्यासाठी करतात. यामुळे कलिंगडात लालभडक रंग येतो.
काही अभ्यासानुसार एरिथ्रोसिनच्या दीर्घकाळ सेवनामुळे लहान मुलांच्या वर्तणुकीवर याचा दुष्परिणाम होऊ शकतो, तसंच थायरॉईडसारख्या इतर गंभीर समस्या उद्भवू शकता.
एरिथ्रोसिनचा प्रजनन प्रणालीवरही परिणाम होत असल्यास दिसून आलं आहे, त्यामुळे कित्येक देशांमध्ये हे केमिकल बॅनही करण्यात आलं आहे.
पण मग आता तुम्ही घेतलेल्या कलिंगडात हे केमिकल इंजेक्शननं टाकलं आहे की नाही हे कसं ओळखायचं? FSSAI ने इंजेक्शन दिलेलं कलिंगड ओळखण्याची सोपी पद्धत सांगितली आहे.
एफएसएसएआयनं सांगितल्यानुसार की, कलिंगडाचे दोन तुकडे करा. एक कापसाचा बोळा घ्या, तो कलिंगडाच्या आतील भागावर चोळा. जर कापसाला लाल रंग लागला, तर ते कलिंगड केइंजेक्शन दिलेलं आणि कापसाच्या बोळ्याला लाल रंग लागला नाही तर ते कलिंगड चांगलं आहे.
