Tuesday, April 22, 2025
घरमहाराष्ट्रकैद्याने चालत्या पोलीस व्हॅनमधून उडी टाकून केले पलायन 

कैद्याने चालत्या पोलीस व्हॅनमधून उडी टाकून केले पलायन 


प्रतिनिधी : मोक्कातील आरोपांत कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या चार कैद्यांना सुरक्षेच्या कारणास्तव चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात पाठवण्यात येत असताना यातील विशाल ऊर्फ अनिल बाळासाहेब रुपनर (२३) या कैद्याने चालत्या पोलीस व्हॅनमधून उडी टाकून पलायन केले. रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूरराष्ट्रीय महामार्गावरील नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास घडलेल्या या थरारात कोल्हापूर आणि नांदेड पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलायन केलेल्या कैद्याला मडकी कलंबर (जि. नांदेड) येथून पुन्हा जेरबंद केले असले तरी पोलिसांच्या गाफीलपांची मात्र सध्या सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत चांगलीच चर्चा सुरू आहे.

चार कैद्यांना कळंबा कारागृहातून चंद्रपूर येथील कारागृहात पाठवताना विशाल ऊर्फ अनिल बाळासाहेब रुपनर (२३) या कैद्याने चालत्या वाहनातून उडी टाकून पलायन केले. नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी कोल्हापूर आणि नांदेड पोलिसांनी पळालेल्या कैद्याला मडकी कलंबर (जि. नांदेड) येथून चार तासांत पुन्हा जेरबंद केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments