प्रतिनिधी : ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वच प्रश्नांची उत्तरे देताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाही चढवला. बबनराव घोलप आमच्यासोबत आले. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी खांद्यावर भगवा घेतला आहे. त्यांना तिकडे जो अनुभव आला, तोच अनुभव आम्हालाही आला आहे, असा उद्धव ठाकरे यांना टोला लगावतानाच बबनराव, तुम्ही चर्मकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनच काम करायचे आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राजस्थानातील दोन आमदार उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
