प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीचा धुराळा सगळीकडे उडाला आहे. अवघ्या काही दिवसांत मतदान सुरु होणार त्यामुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित केली जात आहे. दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार लढणार हा प्रश्न ऐरणीवर होता. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी जाहीर केली. कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीकांत शिंदे यांची लढणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे.
श्रीकांत यांची उमेदवारी घोषित केल्यापासून विरोधी पक्षाकडून टीका होत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी श्रीकांत शिंदे आणि सरकारवर टीका केली आहे. ट्वीटरवर ट्वीट करत त्यांनी शिंदे गटावर हल्ला बोल केला आहे. त्यांनी ट्वीटरवर लिहलं आहे की, ”श्रीकांत शिंदे हे एकनाथभाऊंचे चिरंजीव म्हणून आस्था, आपुलकी आहे. पण त्यांची उमेदवारी राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या त्यांच्या वडिलांनी/डुप्लिकेट पक्षप्रमुखांनी जाहीर करण्याच्या ऐवजी फडणवीसांनी जाहीर करावी यातून शिंदेसेनेचा रिमोट भाजपच्या हातात आहे हे स्पष्ट होते.
सुषमा अंधारे यांचा ट्वीच व्हायरल होत आहे. बोचऱ्या शब्दात त्यांनी शिंदे गटावर टीकास्त्र केला आहे. सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार, शिंदे गटाचा रिमोट भाजपच्या हातात आहे. उमेदवारी घोषित केल्यानंतर विरोधी पक्षाच तापमाण वाढल्याचे दिसून आले आहे. दरम्यान कल्याण मधून वैशाली दरेकर यांची ही उमेदवारी घोषित झाली आहे.
