Thursday, April 17, 2025
घरमहाराष्ट्रनवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांकडून ३१ नागरिकांना मोबाइल सुपूर्द

नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांकडून ३१ नागरिकांना मोबाइल सुपूर्द

मोबाइल गहाळ झाल्यावर वा चोरी झाल्यावर तो शोधणे आता सोपे झाले आहे.

नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांकडून ३१ नागरिकांना मोबाइल सुपूर्द (छायाचित्र – धगधगती मुंबई टीम)

नवी मुंबई : सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सी ई आय आर) पोर्टलची मदत घेत कोपरखैरणे पोलिसांनी चोरी गेलेले ३१ मोबाइल शोधून काढले आहेत. नुकतेच सदर मोबाइल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. १ लाख चाळीस हजाराचा आय फोन ते पाच हजारांच्या साध्या फोनचाही यात समावेश आहे.

मोबाइल गहाळ झाल्यावर वा चोरी झाल्यावर तो शोधणे आता सोपे झाले असून सीईआयआर या पोर्टलवर मोबाइलची तांत्रिक माहिती टाकली असता सध्या मोबाइल कोणत्या ठिकाणी आहे, त्यातील सिमचा क्रमांक काय याची माहिती मिळते. याचाच आधार घेत कोपरखैरणे पोलिस मध्ये कार्यरत असलेले हवालदार राहुल मोरे यांनी मेहनत घेत सर्व मोबाइल हस्तगत केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments