Tuesday, April 29, 2025
घरमहाराष्ट्रचेंबूर मधील आचार्य आणि मराठे कॉलेजमध्ये हिजाबवर बंदी; हायकोर्ट

चेंबूर मधील आचार्य आणि मराठे कॉलेजमध्ये हिजाबवर बंदी; हायकोर्ट

प्रतिनिधी : मुंबईतल्या चेंबूर मधील आचार्य आणि मराठे कॉलेजमध्ये  विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला होता. या विरोधात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने  ही याचिका निकाली काढली. कॉलेजमध्ये हिजाब, बुरखा घालण्यावर बंदी कायम ठेवली आहे. यावर कॉलेजच्या मुख्याध्यापिका विद्या लेले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हायकोर्ट महाविद्यालयाने घातलेली हिजाब बंदी योग्य आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. 9 विद्यार्थीनींनी नकाबबंदीच्या विरोधातली केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. महाविद्यालयाच्या परिसरात हिजाब, नकाब आणि बुरख्यावरची बंदी केवळ एक समान ड्रेसकोडसाठी लागू करण्यात आली असल्याचा युक्तीवाद महाविद्यालयातर्फे न्यायालयात करण्यात आला. मुस्लिम समुदायाला लक्ष्य करणं हा त्यामागचा हेतू नाही. हायकोर्टाच्या निर्णयावर मुख्याध्यापिका काय म्हणाल्या? हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर विद्या लेले म्हणाल्या, की हा ड्रेस कोडं शाळेच्या शिस्तीचा भाग आहे. यात धर्म जात वैगरे काही नाही. हा सगळा निर्णय संस्थेचा होता. न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याची ऑर्डर आल्यावर आम्ही बोलू. तुमच्या माध्यातून समजलं ही केस फेटाळली आहे. आम्ही आतापर्यंत ड्रेस कोडं लावला नव्हता. पण सगळे अंग झाकणारा ड्रेस असावा असं सांगितलं होतं. पण ज्याप्रमाणे तरुण पिढी वाढतेय, त्याप्रमाणे स्वातंत्र्याकडून असभ्यतेकडे वाहायला नको. तसेच कोणत्याची धर्माची कोणत्याही व्यक्तीकडून हिरमोड होऊ नये म्हणून संस्थेने हा निर्णय घेतला होता.
प्रत्येक विद्यार्थ्यांना नियम सामान आहेत, मग ते कोणत्याही धर्माचे असूदेत. त्याचप्रमाणे कॉलेजमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना कपडे बदली करण्यासाठी कॉमन रूम आहे. त्याप्रमाणे त्यांना बदली करता येणार आहे. कॉलेजनंतर विद्यार्थी यांना पुढील जीवनात जाऊन चांगले शिस्तीचे पालन व्हावे, यासाठी हा नियम महाविद्यालयामध्ये केला असल्याचे विद्या लेले यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments