प्रतिनिधी : ,शिंदे सरकारचे हे शेवटचं अधिवेश असणार आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन होतं आहे, असं वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकावर खोचक टीका केली आहे.

उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळांचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. दरम्यान, काही महिन्यातच विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर शिंदे सरकारचे हे शेवटचं अधिवेश असणार आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन होतं आहे, असं वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकावर खोचक टीका केली आहे. पुढे उद्धव ठाकरे असेही म्हणाले की, उद्या मी पावसाळी अधिवेशनात असेल त्यावेळी उद्या माध्यमांशी बोलताना राजकीय विषयाबाबत माझी भूमिका मांडेन. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे पावसाळी अधिवेशन यंदा चांगलंच वादळी ठरण्याची शक्यता आणि तशी चिन्ह दिसत आहेत.