खटाव (अजित जगताप) : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीस अवधी असून महाविकास आघाडीमध्ये आनंददायी वातावरण आहे. लोकसभेच्या निवडणुकीत माढा मधून महाविकास आघाडीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले अनेक मातब्बर नेते गणांपैकी शिवसेनेचे संपर्कप्रमुख व युवा नेते शेखर गोरे यांच्यासाठी माण- खटाव विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुकूल वातावरण झालेले आहे. त्यांना महाविकास आघाडीच्या एकसंघपणाने सुवर्णसंधी मिळणार असल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू झालेले आहे.
सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे विधानसभा उमेदवारी बाबत प्राथमिक सूत्र निश्चित झाली आहे. जेष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांची राष्ट्रवादी व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि इतर घटक पक्ष असे मिळून महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत चांगले यश मिळालेले आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मतदार संघ आढावा व अहवाल तयार करण्याचे काम सुरू झालेले आहे.
सातारा जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेल्या माण- खटाव व कराड उत्तर या ठिकाणी महाविकास आघाडी एकसंघ लढल्यास यश मिळेल. तर वाई , फलटण मतदारसंघात राष्ट्रवादी आणि कराड (दक्षिण) व पाटण राष्ट्रीय काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कोरेगाव आणि सातारा- जावळी मधून आपली उमेदवार देण्यास प्रथम प्राधान्य देईल असे संकेत मिळत आहेत. या फॉर्मुल्याप्रमाणे जर उमेदवारी वाटप झाले तर महाविकास आघाडीला बऱ्यापैकी यश मिळणार आहे. त्या दृष्टीने बोलली सुरू झाले असून इच्छुक उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क ठेवण्यात धन्यता मानलेली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्याचे काम हे प्रामुख्याने शिवसेना व राष्ट्रवादीला महत्त्वाचे वाटत आहे. कारण भारतीय जनता पक्षासोबत गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना व त्यांच्या समर्थकांना धडा शिकवण्यासाठी हे दोन्ही पक्ष सामंजसाची भूमिका घेतील असा कयास आहे.
सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीची स्थिती सुद्धा भक्कम आहे. सोबत वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर आले तर दुग्ध शक्कर योगायोग होणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाल्यास महाविकास आघाडीला माण -खटाव मतदारसंघ युवा नेते शेखर गोरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे निश्चितच यश मिळेल असा दावा करण्यात येत आहे. यासाठी युवा नेते व शिवसेना संपर्कप्रमुख शेखर भगवानराव गोरे यांचे नाव चर्चेत पुढे आले आहे.राज्यात शिवसेना फुटलेली असताना उद्धव ठाकरेंचा साताऱ्याचा सेनापती कोण? अशी चर्चा अस्ताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सूत्रे मान खटाव च सुपुत्र व युवा नेते शेखर गोरे यांच्याकडे दिली आहे.
साताऱ्यात शिवसेनेला आक्रमक नेतृत्वाची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी शिंदे गटात गेले. मात्र सामान्य शिवसैनिक व युवा नेते शेखर गोरे हे उद्धव ठाकरेंबरोबर कायम राहिले आहेत. महाविकास आघाडीने मान खटाव मध्ये शिवसेनेला सुधीर देऊन परिवर्तन घडवावेच लागणार आहे. याबद्दल कोणाचे ही दुमत नाही
. लोकसभेच्या निवडणूक निकालाने पश्चिम महाराष्ट्रात जलसंधारणाबरोबर राजकीय मनसंधारण झाले आहे. त्यामुळे माण खटाव मतदार संघात महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळालेल्या संधीचे सोने करावे लागणार आहे.
माण- खटाव दुष्काळी भागात राजकारण सोडून भाजपला रोखण्यासाठी एकमेकांना प्रामाणिकपणे मदत करावी लागणार आहे. युवा नेते शेखर गोरे यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचे काम होत आहे. लोकांच्या भावनाची कदर करून वॉटर कप स्पर्धा संपेपर्यंत पोकलेन मशीन व पिण्याच्या पाण्याचे टँकर मोफत देऊन माणुसकी जपलेली आहे जातीपातीच्या पलीकडे जाऊन युवा नेते शेखर गोरे यांनी आपले चांगली मजबूत फळी माण- खटाव मतदारसंघात उभी केलेली आहे. त्याचा त्यांना विधानसभा निवडणुकीत निश्चितच फायदा होणार आहे.
अलीकडे अनेकजण पोकळ व दिशाहीन बोडी गॅरंटी सारखी आश्वासन देऊन निघून जातात. याची जाणीव मतदारांना चांगली झालेली आहे. सध्या माण खटाव मतदार संघाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून विद्यमान आमदार गोरे यांच्या समर्थकांच्या विरोधात पूर्वी इतर पक्षाचे नेते होते. आता मतदार सुद्धा उघडपणाने बोलू लागलेले आहेत.
माण- खटाव तालुक्यातील १०५ गावांपैकी ६४ गावात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जर भाजपचे आ.जयकुमार गोरे यांनी १८९ गावात पाणी पोहोचवले तर मी मागे घेतो. तसेच त्यांचा स्वतः जलनायक म्हणून सत्कार करतो. असे अंबवडे तालुका खटाव येथे झालेल्या जाहीर सभेत युवा नेते शेखर गोरे यांनी आव्हान दिले होते.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजय व्हावे या एक सूत्राने राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) प्रभाकर देशमुख व अभयसिंह जगताप, शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते शेखर गोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख आदी नेत्यांनी एकदिलाने खिंड लढवली. आता माण- खटाव विधानसभेसाठी सुद्धा एक धक्का और दो ..अशी मागणी दस्तुरखुद मतदार करू लागलेले आहेत. जातीपातीच्या राजकारणाचा विचार न करता युवा नेते शेखर गोरे यांच्यासाठी मराठा ओबीसी दलित अल्पसंख्यांक नक्कीच मतदान करून मान खटाव मध्ये परिवर्तन आणतील असा विश्वास महाविकास आघाडीचे अभ्यासू व पुरोगामी विचारसरणीची बांधिलकी जपणारे करत आहेत.
