
सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत )श्रीमती अर्चना वाघमळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराबाबत व आरोग्य विभागातील गैरकारभाराबाबत श्री शशिकांत जाधव यांनी आरोप करून उपोषण केले होते. त्याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी यांनी पुणे विभागीय आयुक्त यांनी तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी सूचना केल्याचे पत्र दिल्याने खळखळ माजली आहे.
याबाबत माहिती अशी की ,सातारा जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अर्चना वाघमळे यांच्या भ्रष्टाचाराबाबत उपोषण करते श्री शशिकांत शिवाजी जाधव मुक्काम पोस्ट तारळे, जिल्हा सातारा यांनी २४ नोव्हेंबर २३ व एक जून २०२४ व २१ जून २०२४ रोजी लोकशाही मार्गाने लेखी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये प्रती ग्रामसेवक पाच हजार रुपये व ग्राम विकास अधिकारी यांच्याकडून सात हजार रुपये दिवाळी व मार्च महिन्यात कलेक्शन गोळा केले. तसेच खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील अपहर व सरकारी सेवा केंद्राचे बनावट खोटे खाते उघडून घोटाळा केला आहे. सदर घोटाळा लपविण्यासाठी लॅपटॉप, मोबाईल जप्त करून पुरावा नष्ट करण्याचे काम केले. असा आरोप करून सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जाधव हे पंधरा दिवसापासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते .परंतु याची कुठेही वाचत होऊ नये. म्हणून जिल्हा परिषदेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अनेक यंत्रणेशी संपर्क साधला. असाही आरोप श्री सुनील बावधनकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांच्या अनियमित व अनाधिकृत भ्रष्ट कारभाराबाबतही आरोप करण्यात आलेले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये या सर्व प्रकरणाची सी.आय.डी. मार्फत चौकशी करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. पण, त्याची गंभीर दखल न घेतल्यामुळे साताऱ्यात पत्रकार परिषद आयोजित केली परंतु त्यालाही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे या भ्रष्ट कारभाराबाबत यंत्रणा पोखरल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.