सातारा(अजित जगताप) : सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक व गोंधळ हे समीकरण झाले होते. पण, बँकेच्या शताब्दी महोत्सव वर्षा निमित्त ७७ व्या वार्षिक सभेमध्ये सर्वच प्राथमिक शिक्षक सभासदांनी आचरण चांगले ठेवले . ही वार्षिक सभा अभुतपूर्व गोंधळाविना पार पडली. त्यामुळे प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्व सभासदांना सातारकरांनी धन्यवाद देऊन त्यांना शताब्दी महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या ७७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा मोरया लॉन्स मंगल कार्यालय, दत्तनगर, सातारा- रहिमतपूर रोड कोडोली या ठिकाणी दुपारी एक वाजता सरस्वती पूजन व दीप प्रज्वलाने सुरू झाली. प्रारंभी स्वागत व श्रद्धांजली आणि प्रस्ताविक भाषण व विषय पत्रिकेच्या कामकाज , वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून तसेच अहवाल सादर केल्यानंतर शांततेने वाटचाल करत सभा सुरू झाली. ऐनवेळीच्या विषयाने सभेला सर्व विषय एकमतने मंजूर करण्यात आले.
प्राथमिक शिक्षक संघ व प्राथमिक शिक्षक समिती आणि इतर संघटना या सर्वांच्या सहकार्याने सभेपूर्वीच सर्वांनी एकमेकांशी समझोता करून शताब्दी महोत्सवी वर्षात प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभा शांततेत पार पाडण्याचे सूचिन्ह दाखवले. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही त्यामुळे चांगलाच आराम मिळाला. चेअरमन किरण यादव, व्हाईस चेअरमन शहाजी खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे ,बँकेचे संचालक नवनाथ जाधव ,संजीवनी जगदाळे, विजय ढमाळ, सौ पुष्पलता बोबडे, राजेंद्र बोराटे, विजय बनसोडे ,शशिकांत सोनवलकर, नितीन काळे, तानाजी कुंभार, सुरेश पवार, सौ निशा मुळीक, नितीन फरांदे, विशाल कणसे, ज्ञानबा डाबरे, संजय संकपाळ यांनी विविध विषयाला सूचक व अनुमोदक म्हणून आपली भूमिका जाहीर केली.
या सभेला सर्व प्राथमिक शिक्षक सभासदांनी शांततामय वातावरण कायम राखण्यासाठी समंजस भूमिका घेतली. हे आकर्षणाचे केंद्र ठरले. संचालक व शिक्षक सभासद यांनी या वार्षिक सभेला आपली भूमिका विशद करताना प्राथमिक शिक्षक बँकेने घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेतला. अ वर्ग असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेचे ”””””’आपली बँक आपली माणसं”””””” हे घोषवाक्य या ठिकाणी तंतोतंत पाळण्यात आले. याचा सार्थ अभिमान प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटनेला वाटला आहे. खरं म्हणजे शिक्षक बँकेची प्रगती ही सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनी दाखवलेल्या समंजसपणामुळे अधिक उंचावणारी आहे.
शिक्षक नेते संभाजीराव थोरात, सिद्धेश्वर पुस्तके, राजेंद्र बोराटे, बळवंत पाटील, विश्वंभर रणनवरे, चंद्रकांत यादव, दीपक भुजबळ, विठ्ठल माने, महेंद्र जानुगडे, सुरेश गायकवाड, नारायण शिंगटे, सतिश जाधव व सर्व संचालक व पदाधिकारी कर्मचारी, अधिकारी व सभासद यांचेही सहकार्य लाभले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये निव्वळ नफा तीन कोटी ४४ लाख८६८ रुपये २९ पैसे इतका झाला असून नफ्याची विभागणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ६५ व आपल्या बँकेच्या पोट नियमातील तरतुदी अधिक राहून करण्यात आली आहे. सभासदांना ६.५० टक्के दराने लाभांश देण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. या वार्षिक सभेमध्ये सर्व शिक्षक सभासद व नेतेगण मंडळींनी ७७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी बँक प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त एकमेकांना मनापासून शुभेच्छा देऊन भव्य दिव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे मान्यता दिलेली आहे. प्राथमिक शिक्षक बँक व गोंधळ ही युती संपुष्टात आली असून यापुढे आता प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ही महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला दिशादर्शक ठरेल. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
