प्रतिनिधी : सकल ओबीसी समाज, सर्व समाज ओबीसी आघाडी, ओवीसी एकत्रीकरण समिती. महाराष्ट्रामधील पुणे व वडीगोद्री येथे चालु असलेल्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा व ओबीसी समाजाच्या मागण्यासाठी दि. २४ जुन २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे सकल ओबीसी समाजाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये ओबीसीविरोधी निर्णय होत आहेत, त्याबद्दल पुणे येथे अॅड. मंगेश ससाणे व वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे आमरण ओबीसीच्या न्याय हक्कासाठी उपोषणास बसले आहेत. त्यांना आमचा जाहीर पाठिंबा. व तसेच ओबीसी समाजाच्या खालील मागण्यासाठी एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार आहोत. त्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे :
१) सगे-सोयरे यांची अधीसुचना रद्द करण्यात यावी. २) जातनिहाय जनगणना ओबीसी-भटक्या जाती जमाती यांची जातनिहाय जनगणना करून लोकसंख्याप्रमाणे ५२% आरक्षण द्यावे. ३) ५ मे २०२३ सुप्रिमी कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. ४) २५/०५/२०२३ रोजी शासन निर्णयाने नियुक्त झालेले श्री. संदीप शिंदे समिती अहवाल रद्द करावा. ५) बोगस कुणबी दाखले यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. आपण या मागण्या लवकर पुर्ण कराव्यात. अन्यथा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल. वरील मागण्यासाठी एक दिवसाचे आझाद मैदान मुंबई येथे एकदिवस लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. यावेळी कांचन नाईक, अशोक गिते, संतोष आंबेकर, प्रसाद मांडवकर, मनिष आवटे, शिला पटेल, नितीन बोराटे, डी.जी. गुरव यांच्यासह अनेक सहकारी उपोषणास उपस्थित राहणार आहेत. तसेच यासाठी सर्व समाज ओबीसी आघाडी, ओबीसी एकत्रीकरण समिती, सकल ओबीसी समाज, यांच्यासह अनेक संस्था, संघटना उपोषणास उपस्थित राहणार आहेत. यावरही सरकारने ओबीसी विरोधी कारवाया थांबवल्या नाहीत तर, महाराष्ट्राच्या प्रमुख जिल्ह्यात तिव्र आंदोलन करण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहील. असा इशारा सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आला आला आहे.