ठाणे : खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशके आदींबाबत उद्भवणाऱ्या अडचणींचे निराकरण व्हावे, तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषि विभागामार्फत विभागस्तरावर तसेच प्रत्येक जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष सुरु झाला आहे. बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार दिसताच थेट नियंत्रण कक्षात तक्रार देता येणार आहे, अशी माहिती कोकण विभागाचे कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी दिली आहे.
चालू खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामावेळी येणाऱ्या अडचणींबाबत तक्रारी करता याव्यात, यासाठी विभागास्तरावर तसेच जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षामध्ये कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तक्रार निवारण कक्षाचा भ्रमणध्वनी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तक्रार नोंदविल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले जाणार आहे. कृषि निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिकींगबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण केले जाईल, अशी माहिती विभागीय कृषि सहसंचालक श्री. माने यांनी दिली.
विभागीय कार्यालय, ठाणे – संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक – ८६९१०५८०९४, ई-मेल – toqcthanediv@gmail.com.
ठाणे – ७०३९९४४६८९, ई-मेल – dsaothane.2021@gmail.com.
पालघर – ९४२३९८४४४३, ई-मेल – dsaopalghar@rediffmail.com.
रायगड – ९५०३१७५९३४, ई-मेल – dsaoraigad@gmail.com.
रत्नागिरी – ८६६८५७२५२८, ई-मेल – dsaortn@rediffmail.com.
सिंधुदुर्ग – ९४२३९२२३४६, ई-मेल – saosindhu@gmail.com.
शेतकऱ्यांना कृषि निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास या निविष्ठा तक्रार निवारण कक्षांशी संपर्क साधून तात्काळ तक्रार नोंदवावी असे आवाहन श्री. माने यांनी केले आहे.