प्रतिनिधी : वरळी डेरी समोर, वरळी सिफेस, समुद्राच्या बाजूला असलेल्या महात्मा फुले नगर या झोपडपट्टी लगत असलेल्या 40 वर्षांपूर्वी बांधलेल्या सार्वजनिक सुलभ सौचालायचा पहाटे 6 च्या दरम्यान सज्जाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 2 व्यक्ती जबर जखमी झाल्या. पाऊस असल्यामुळे आणि पहाटेची वेळ असल्याने बाहेर वर्दळ नव्हती. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता होती. घरात गरम होते म्हणून बाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर सज्जाचा भाग कोसळून जबर दुखापत झाली आहे त्या व्यक्तीला नायर हॉस्पिटल येथे भारती करण्यात आले आहे.
ही महानगर पालिकेची जबाबदारी असताना या वास्तूचा मेंटनन्स न ठेवल्यामुळे ही घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. विभागात राहणारे आणि प्रवासी यांना सुलभ आणि सोयीचे असणाऱ्या या सौचालयाविषयी महानगर पालिका काय निर्णय घेते या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
