
मुंबई : मुंबईतील धारावी मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार व माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज दिनांक १८ जून २०२४ रोजी आपल्या आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा. वर्षा गायकवाड ह्या २९ उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून विजयी होऊन खासदार झाल्या आहेत म्हणून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.