Tuesday, April 29, 2025
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात जुलैमध्ये ऐतिहासिक वाघ नख्याची प्रतीक्षा

साताऱ्यात जुलैमध्ये ऐतिहासिक वाघ नख्याची प्रतीक्षा


सातारा (अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शिवाजी महाराजांनी शौर्य दाखवले ती वाघनखे साताऱ्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयाचे सातारसह पश्चिम महाराष्ट्रातील शिवप्रेमींना वाघ नख्याची प्रतीक्षा सुरू झालेली आहे. छत्रपती शिवाजी प्राणी संग्रहालयाचे अधीक्षक श्री प्रविण शिंदे यांनी वाघ नखे ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, पोलादीपट्टीवर पाच इंच अंतर व चार सव्वा इंच लांबीचे तीक्ष्ण वाघनखे व त्याला तिन्ही बाजूने शिरा व खालच्या बाजूला धार असलेले दोन्ही बाजूच्या अंगठ्या असणारी ही वाघ नखे सध्या इंग्लंडच्या म्युझियम मध्ये असून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा वापर केला होता .असा इतिहास तज्ञांचे मत आहे. हीच वाघनखे पुन्हा साताऱ्यात येणार आहे. वास्तविक पाहता राजा जयसिंग यांनी तयार केलेली पोलादी धातूची वाघ नखे टिपू सुलतानाच्या घरी नोकरीस असलेल्या सुबाप्पा पैलवान यांच्या जवळच्या व्यक्तीकडून ती घेण्यात आलेली असल्याची इतिहासात नोंद आहे .
या वाघनख्यासाठी खबरदारीचे उपायोजना छत्रपती शिवाजी प्राचीन वस्तू संग्रहालय सातारा या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत . ग्रील दरवाजा व सेंसर असल्यामुळे या वाघनख्याची सुरक्षा भेदून कोणालाही आत जाता येणार नाही. अशी चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे.

शिवरायांनी अफजलखान वधावेळी वापरलेली वाघनखे आज कुठे आहेत,? याचा नेमका ठावठिकाणा सांगता येत नाही; पण इंग्लंडस्थित व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये शिवरायांची म्हणून एक वाघनखे ठेवलेली आहेत . ती वाघनखे या म्युझियमला मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रँट डफ यांचा वंशज अँड्रियन ग्रँट डफ यांच्याकडून भेट म्हणून मिळालेली होती.

जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ हा मराठ्यांचा इतिहास लिहिणारा इंग्रज अधिकारी सातारा संस्थानचा रेसिडेंट म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याची आणि छत्रपती प्रतापसिंह महाराजांची दोस्ती झाली होती. त्यातूनच प्रतापसिंह महाराजांनी ग्रँट डफला आपल्याकडील एक वाघनख भेट दिले होते.
याची नोंद स्वतः एल्फिन्स्टनने एका पत्रात केली आहे.
शिवाजी महाराजांची म्हणून ओळखली जाणारी आणखी दोन वाघनखं इ. स. १९१९ पर्यंत तरी सातारकर छत्रपतींच्या राजवाड्यात पाहावयास मिळत होती.
इ. स. १८७४ मध्ये हा डफचा मुलगा भारत भेटीवर आला होता. त्यावेळी त्याने सातारा येथील राजवाड्याला भेट दिली होती. त्या वेळी या ठिकाणी दोन वाघनखंही पाहिली होती. त्याचे वर्णन त्याने आपल्या ‘नोट्स ऑफ इंडियन जर्नी’ या पुस्तकात लिहून ठेवले आहे.

आज व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखेही शिवरायांची आहेत याला अजूनपर्यंत तरी सबळ पुरावा नाही. कारण अशा पद्धतीची वाघनखे प्रतापसिंह महाराजांनी ग्रँट डफ व एल्फिन्स्टनला दिली होती. इ. स. १८२६ च्या अगोदर आणि त्यानंतर इ. स. १८४४ पर्यंत शिवरायांची म्हणून ओळखली जाणारी दोन वाघनखे सातारा छत्रपतींकडे होती,
महाराष्ट्राचे माजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील हे खास शस्त्र परत येणार आहे. ते परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री, विभागाचे प्रधान सचिव, संचालक, पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालय यांच्या शिष्टमंडळाने लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय आणि इतर संग्रहालयांना भेट दिली होती .आणि तेथे एक करार केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही ‘वाघनखे’ एक ऐतिहासिक अनमोल ठेवा मानला जातो आणि त्याच्याशी राज्यातील जनतेच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे छत्रपतींच्या राजधानीत जुलै महिन्यात नंतर दहा महिने ही वाघ नखे पहाण्यास मिळणार आहे.


चौकट —इंग्लंड येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला प्रसिद्ध वकील ऍड .असीम सरोदे यांनी भेट दिली होती . या म्युझियम मध्ये असलेली वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली आहे का नाही? याबाबत खात्रीशीर माहिती दिली नसल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments