
उंडाळे (वार्ताहर) उंडाळे ता. कराड येथील द इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यावतीने शाळेच्या पहिल्या दिवशी नवगतांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले, यावेळी शाळेच्या दर्शनी भागात सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आला होता.विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवसापासून शाळेची गोडी निर्माण व्हावी याच उद्देशाने रंगरंगोटी व सजावट करून शाळेमध्ये येणाऱ्या नवगतांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले , यावेळी शाळेचे मुख्याध्यापक धनाजी देसाई ,व्यवस्थापक पांडुरंग पाटील, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी नवगतांचे जल्लोषात स्वागत केले ,दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा वरदान ठरली आहे ,दहावी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव पाटील बापू, संचालक आनंदराव पाटील उर्फ राजाभाऊ पाटील उंडाळकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापिका गीतांजली पाटील आदींनी अभिनंदन केले ..