Sunday, April 20, 2025
घरमहाराष्ट्रविधानसभेसाठी इंडिया आघाडीची जय्यत तयारी  वंचितला सोबत घेणार का ? उद्धव ठाकरे...

विधानसभेसाठी इंडिया आघाडीची जय्यत तयारी  वंचितला सोबत घेणार का ? उद्धव ठाकरे यांचे उत्तर ; विना अट यावे

 

प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचितने अगोदर उद्धव ठाकरे गटाला जवळ केले. मग हो नाही करत महाविकास आघाडीच्या मंचावर वंचित दाखल झाली. पण पुढे हा प्रयोग काही रंगला नाही. वंचित आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमधील बेसूर समोर आले. काही काळातच वंचितने एकला चलो रे चा नारा दिला. महाविकास आघाडीने वंचिताला थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. वंचिताला लोकसभेता मोठा आपटी बार बसला. एकही जागा पदरात पडली नाही. उलट काही उमेदवारांचे अमानत रक्कम जप्त झाले. आता महाविकास आघाडी वंचितला पुन्हा सोबत घेणार का? या प्रश्नाला ठाकरे यांनी एका वाक्यात असे उत्तर दिले.

वंचितने सर्वात अगोदर उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यानंतर वंचितला महाविकास आघाडीच्या मंचावर स्थान पण मिळाले. पण कुरबुर थांबता थांबेना. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित स्वतंत्र लढणार असल्याची भूमिका मांडली. त्यानंतर वंचितने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. त्यांना लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले. त्यामुळे आता राज्यात विधानसभा निवडणुकीत वंचिताला सोबत घेणार का असा प्रश्न समोर येणे साहाजिक होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर दिले.

काही लोक आमच्यासोबत होते. त्यांना घेऊन पुढे जाऊ. कुणी जर आमच्यासोबत येत असतील. कोणतीही अट आणि ओढताण न करता येत असतील तर त्यांनी यावं, असा स्पष्ट संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यामुळे वंचिताला महाविकास आघाडीची दारं सताड उघडी असली तरी त्यांना अटी आणि शर्तीवर आघाडीत येता येणार नाही, असा संदेश त्यांनी दिला आहे. तुम्ही जे नाव घेतलं. मी त्यावर बोलत नाही. मी जनरल बोलतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

यावळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पण निशाणा साधला. त्यांना समजायला पाहिजे होतं. संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिलं होतं. कसंबसं त्यांचं पंतप्रधानपद वाचलं. किती दिवस सरकार राहील सांगता येत नाही. गुजरातबाबत चालुगिरी करायला लागले, तर त्यांच्या मूळ राज्यातच त्यांना सुरुंग लागेल. नरेटिव्ह म्हणता, ते एका बाजूला आहे. पण यांच्यात खरेपणा नाही. यांचा फोलपणा समोर आला आहे. देशातील जनता जागी झाली. मोदींवर लोकांचा विश्वास होता. तो उडाला आहे. आता पुढील निवडणुकीत देशाचं चित्र अधिक चांगलं राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments