Tuesday, April 22, 2025
घरमहाराष्ट्रस्पंदन ट्रस्ट चे कार्य कौतुकास्पद : कविता राम (पार्श्वगायिका)

स्पंदन ट्रस्ट चे कार्य कौतुकास्पद : कविता राम (पार्श्वगायिका)

प्रतिनिधी : ‘वसा सामाजिक बांधिलकीचा’ हे ब्रीद वाक्य घेवून डाॅ.संदीप डाकवे यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे कार्य कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार सुप्रसिध्द पार्श्वगायिका कविता राम यांनी काढले.
डाॅ.संदीप डाकवे यांनी स्पंदन ट्रस्ट ने राबवलेल्या विधायक उपक्रमांची माहिती कविता राम यांना दिली. त्यांनी ट्रस्ट च्या अहवालाची बारकाईने पाहणी करत उपक्रमांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
डाकेवाडी सारख्या दुर्गम भागात राहूनही डाॅ.संदीप डाकवे आणि त्यांचे सहकारी यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. लोकसहभागातून राबवलेल्या या उपक्रमांना समाजातून नेहमी उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. याshवाय माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, छत्रपती संभाजीराजे, खा.श्रीनिवास पाटील, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड, आ.शिवेंद्रसिंहराजे भोंसले, आ.बाळासाहेब पाटील यासह अन्य मान्यवरांनी शुभसंदेश पाठवून ट्रस्टच्या कार्याचा गौरव केला आहे.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक कला, क्रिडा, आरोग्य इ.कार्याच्या उत्कर्षाने समाजात प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील ‘स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट’ ची स्थापना 2014 रोजी झाली असून 4 मे, 2018 रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालय सातारा येथे रीतसर नोंदणी झाली आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारे स्पंदन ट्रस्ट म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे.

चौकटीत : समाजभान जपणारी गायिका :
कविता राम या समाजभान जपणाऱ्या सेलिब्रिटी गायिका असून त्यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या अनेक उपक्रमात आपले योगदान दिले आहे. याशिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातून ट्रस्ट च्या उपक्रमाचे कौतुक करत असतात. नुकत्याच कविता राम यांचा युके (इंग्लंड) या देशामध्ये गाण्याचा यशस्वी कार्यक्रम झाला. त्याबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि स्पंदन एक्सप्रेस चा विशेषांक देवून सन्मान केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments