
प्रतिनिधी : सालाबादप्रमाणे याही वर्षी उपरोक्त मंडळाच्या वतीने आणि आपल्या सर्व अन्नदात्यांच्या सहकार्याने आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या दिंडी सोहळ्यातील वारक-यांसाठी मोफत अल्पोहार वाटप रविवार दि. ३० जून २०२४ रोजी सकाळी ठीक ०८:०० वाजता,स्थळ : आळंदी दिघी रोड,पुणे आपणा सर्वांच्या सहकार्याने होणार आहे.
जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणणे सोपे असले, तरी सेवा करणे हे सर्वांसाठी साधारण कार्य नसून, हे धार्मिक व पारमार्थिक कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने होत असते. हा पवित्र संकल्प पार पाडण्यासाठी आपण धार्मिक, उदात्त व उदार अंतःकरणाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य करावे हीच आमची विनंती. आजवर आपण केलेले सहकार्य अनमोल आहे. असेच सहकार्य व आशीर्वाद आम्हाला कायम मिळतील हि अपेक्षा. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे तरी आपणांस या प्रेमळ निमंत्रणाने आम्ही आमंत्रित करीत आहोत..! तरी आपण या अवर्णनिय धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा हि नम्र विनंती.
टिपः ज्या अन्नदात्यांना उपरोक्त कार्यक्रमासाठी सक्रिय सहभाग घ्यायचा असेल त्यांनी खालील कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.
श्री. संदीप उत्तेकर ९९२०३७९१२३ श्री. मारुती पार्ट ९२२४४ ३६६५५
Account Name: Mauli Sanskrutik Krida Mandal Nipani Bank Name: Punjab National Bank A/c No: 52581012000831 IFSC CODE: PUNB0525810 Branch: Thakur Village, Kandivali East या खात्यावर आपली मदत पाठवू शकता.