Tuesday, April 22, 2025
घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांनी मानले महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे आभार

शेतकऱ्यांनी मानले महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे आभार

तळमावले/वार्ताहर :  राज्यामध्ये मान्सुन पावसाने प्रवेश  केला असला तरी विभागामध्ये अजून पावसाळयापूर्वीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. तालुक्यातील शेतकरी पेरणीसाठी बी-बियाणे साठवण आणि खरेदीसाठी कामाला लागला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी उन्नती योजना अंतर्गत सोयाबीन ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी ढेबेवाडी येथे 100 क्विंटल सोयाबीन वान केडीएस 726 (फुले संगम) ढेबेवाडी विभागातील शेतकरी बांधवांना वितरित करण्यात येत आहे. 30 कीलो पॅकींग 2400/- रुपये अनुदान रक्कम 600/- रुपये वगळता शेतकऱ्यांना 1800/- रुपये प्रमाणे बियाणे वाटप करण्यात येत आहे. ढेबेवाडी येथील दिग्विजय कृषी सेवा केंद्र, खरेदी विक्री संघ ढेबेवाडी आणि तळमावले येथील श्री वडजाई कृषी सेवा केंद्रामध्ये ही बियाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

             पाटण तालुका कृषी अधिकारी श्री कुंडलिक माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना बियाणे वितरीत करण्यात येत आहे. दरम्यान, ढेबेवाडी येथे प्रातिनिधिक स्वरुपात शेतकऱ्यांना बियाणे वितरीत करण्यात आले. यावेळी ढेबेवाडी कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी, कृषी पर्यवेक्षक एस. टी.नेवसे, कृषी सहायक अर्जुन पवार, विद्यादेवी जंगम, गणेश सावंत, प्रतापराव देसाई, किरण काळे, रमेश काळे व अन्य शेतकरी उपस्थित होते.

अनुदानावर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत खाते उतारा, सात बारा, आधार कार्ड, बॅंक पासबुकाची झेराॅक्स सोबत न्यावी लागणार आहे.

                कुंभारगाव, ढेबेवाडी आणि तळमावले विभागातील बळीराजाही खरीप हंगामासाठी सज्ज झाला असून कृषी सेवा केंद्रावर खते, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागला आहे. जून मध्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बळीराजा पेरणीपूर्व शेतीची मशागत करत आहे.

            महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी उन्नती योजना अंतर्गत सोयाबीन ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी ढेबेवाडी यांनी अनुदानावर असणारी बियाणे खरेदी विक्री संघ व  कृषी केंद्रावर उपलब्ध करुन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments