सातारा(अजित जगताप) : महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये जनतेने निवडणूक हाती घेतल्यामुळे विजय सोपा झाला. आता जबाबदारी वाढली असून निकाल लागल्यापासून दुष्काळी भागात पाऊस कोसळत आहे हे शुभ संकेत असल्याचे मत माढा नवनिर्वाचित खासदार मोहिते पाटील यांनी सातारा येथील राष्ट्रवादी भवन मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी सरचिटणीस राजकुमार पाटील , राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष समिंदरा जाधव, नलिनी जाधव, भारती काळंगे, डॉ. नितीन सावंत, जाबीर बेपारी, जमील बेपारी, दिलीप बाबर, मकरंद बोडके, स्वप्निल वाघमारे, पारिजात दळवी शहाजी शिरसागर, विजय बोबडे ,शफिक शेख, उद्धव बाबर आदी मान्यवर उपस्थित होते .
या वेळेला नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शाल- श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. लोकसभा मतदारसंघात आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, माजी मंत्री श्री विजयसिंह मोहिते पाटील, पक्षप्रमुख राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने व जनतेने मोलाची साथ दिल्यामुळे हा जनतेचा विजय आहे. मतदार संघातील सिंचनाचा व रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न करणार आहे. विशेष बाब म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये रस्त्याचे जाळे निर्माण करणारे मंत्री नितीन गडकरी यांची उमेदवारी भाजपच्या तिसऱ्या यादीमध्ये आली. आणि माढा तील भाजप निष्क्रिय खासदार यांचे नाव मात्र पहिल्याच यादीत आले होते. असे त्यांनी सुचित केले. माढा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात विकास कामे करून सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळेला खटाव तालुक्यातील युवा नेते श्री धनंजय चव्हाण यांनीही दुष्काळी भागाच्या वतीने त्यांचे स्वागत केले…… …………………………….
