प्रतिनिधी : लावणी कलावंत महासंघाच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना लावणी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. त्याचबरोबर कलाकारांच्या मुलांचा गुणगौरव समारंभ देखील घेण्यात येत असतो.यंदाच्या १० वर्धापन दिनाचे पुरस्कार लावणी कलावंत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष -संतोष लिंबोरे पाटील, विश्वस्त – जयेश चाळके, अध्यक्ष – कविता घडशी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित कार्यकरणी यांच्या सहमतीने लावणी गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
यामध्ये जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी – नृत्यसमशेर माया ताई जाधव, लावणी गौरव २०२४ पुरस्काराचे मानकरी खालील प्रमाणे आहेत.
गोविंद हडकर – तालवादक, राधा धारेश्वर – पार्श्वगायिका, आकांक्षा कदम – लावण्यवती, बाळासाहेब आहिरे – निर्माता, विठ्ठल कदम – शाहीर, प्रमोद कांदळकर – पुरुष लावणी कलावंत,-
यशवंत शिंदे – लोककलावंत बतावणी, सूचित ठाकूर – निवेदक, किरण काकडे – नृत्य दिग्दर्शक, उल्हास सुर्वे – नेपथ्यकार, तर कलाकार यांच्यामध्ये चिट्टी टाकून राजा राणी पुरस्काराचे मानकरीठरवले जातात. तो मान यावर्षी श्री व सौ.सुचित्रा जयेश चाळके यांना मिळाला. सदर पुरस्कार सोहळा बुधवार १० जुलै २०२४, सायं ४.३० वा. स्थळ – श्री शिवाजी मंदिर, दादर येथे आयोजित करण्यात आला आहे.असे लावणी महासंघातर्फे सांगण्यात आले.
