
प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका उपायुक्त परिमंडळ दोन प्रशांत सपकाळे यांच्या निर्देशान्वये तसेच सहाय्यक आयुक्त जी-उत्तर अजितकुमार आंबी यांच्या प्रमुख उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका डीप क्लिनिसिंग विशेष मोहीम दादर परिसरातील छ.शिवाजी महाराज पार्क परिसरात आज दिनांक ०८/०६/२०२४ रोजी सका ७.३० वा ते १२.३० पर्यंत आयोजीत करण्यात आली होती.
या विशेष डिप क्लिनिसिंग कार्यक्रमासाठी मनपा ४० कामगार,तसेच दुरूस्ती विभाग, गार्डन,किटक निमंत्रण मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिन्या, अतिक्रमण विभाग,पाणी खाते इत्यादी खात्यातील कामगार कर्मचारी अधिकारी इत्यादींनी भाग घेतला होता.
विशेषतः घकव्य खात्यातील मोठ्या संख्येने मनुष्यबळ सहभागी झाले होते तसेच जेसीबी डंपर,मोठे व छोटे दाब यंत्र तसेच एससीव्ही,लिटर पिकर, मिसब्लोईंग,Manuel गाडी,फायरेक्स मशिनरी तसेच सक्शन मशिन इत्यादी यंत्रणाचा उपयोग करुन शिवाजी पार्क परिसर कचरा मुक्त करण्यात आला.
या मोहिमेत एस.व्ही.एस रोड,केळूस्कर रोड एम बी राऊत रोड धुऊन व ब्रशींग करुन घेतले.
या मोहिमेत स्वच्छता दूत,तसेच मार्शल यांनी विभागात कचरामुक्त होण्यासाठी जनजागृती केली.
विशेष डीप क्लिनिसिंग मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेषत: सहाय्यक अभियंता श्री अमोल गिते यांनी नेतृत्व केले तर इतर खातेप्रमुख यांनी मार्गदर्शन तसेच उत्तम सहकार्य केले.