सातारा(अजित जगताप) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलल्यामुळे गेले दीड वर्ष प्रशासनाच्या हाती कारभार आहे . सर्व काही निर्णय त्यांनाच घ्यावे लागत होते. मात्र, साताऱ्यात समाज कल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील प्रभारी सहाय्यक संचालक सपना सुखदेव घोळवे या वर्ग एकच्या महिला अधिकाऱ्याने एक लाखाची लाच स्वीकारली. त्याच वेळी त्यांना लातूर प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून त्यांचे स्वप्न भंग केले. तर समाज कल्याण निरीक्षक दीपक भगवान पाटील यांचाही त्यात हात असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले .
याबाबत माहिती अशी की, समाजातील उपेक्षित व वंचित असलेल्या भटक्या जाती जमातीच्या विकासासाठी समाज कल्याण विभागाच्या मार्फत भरघोस अनुदान दिले जाते. भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जातो. पण ,यामध्ये मोठ्या प्रमाणात निधीमध्ये गळती होत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे.
साताऱ्यात भटक्या जाती प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत शिक्षण घेण्याकरता खूप परिश्रम व कष्ट घ्यावे लागतात. मात्र आयत्या पिठावर रेगोटी ओढणाऱ्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हा निधी त्यांच्या स्व कल्याणासाठी जात असतो. यावर निर्बंध घालण्यासाठी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच ५९ लाख ४० हजार रुपयांचे अनुदानाचा धनादेश घेताना दहा टक्के म्हणजे सहा लाख रुपयांची मागणी केली होती. दहा टक्के रक्कम समाज कल्याण अधिकाऱ्याला देण्यापेक्षा संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांना अद्दल घडवण्याचा निश्चय त्या संस्थाचालकांनी केला. त्यांना एक लाख रुपये देण्याचा सौदा ठरवल्यानंतर हा घोळ चव्हाट्यावर आणण्यासाठी सातारा येथील लाख रुपये विभागाकडे लेखी तक्रार करून केली. . सातारा जिल्हा परिषदेच्या इमारतीतील वर्ग एक समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे या भ्रष्ट महिला अधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक दीपक पाटील यांनी सुद्धा अनुदानाचे धनादेश काढण्यासाठी दहा हजार रुपयाची मागणी केली होती. अधिकारीच भ्रष्ट असेल तर कनिष्ठ कर्मचारी सुद्धा मग पैसे घेण्यास मागे पुढे पाहत नाही.
साताऱ्यात हे नेहमीच घडत असते पण तक्रार देण्यास कोणी पुढे येत नव्हते .ज्या भटक्या जाती- जमातीसाठी काम करणाऱ्या शिक्षण संस्थेने लाच लुचपत प्रतिबंधक लोक विभागाकडे तक्रार केल्यामुळे अखेर वर्ग एकच्या अधिकाऱ्याचे स्वप्न भंग करावे लागले. प्रत्येक पुरुषाच्या यशाच्या मागे महिला असते पण समाज कल्याण विभागातच नव्हे तर अनेक विभागांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काही महिलाही आता भ्रष्टाचार करू लागलेले आहेत. हे आता सातारकर यांना अनुभवावे लागत आहे. सातारा जिल्ह्यातील लाथ लुचपत प्रतिबंधक विभागाचे विभागाचे अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे ,दत्तात्रेय पुजारी ,अंमलदार सीमा माने, अजित पाटील, प्रतीक चौगुले ,सलीम माकण दार, धनंजय खाडे, ऋषिकेश वडणीकर सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, विना जाधव ,अनिल वंटमुरे यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला. त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. लाच देणे व घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे. हे माहीत असू नये आज सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात लाचची मागणी करत आहे. यावर आता आळा घालण्यासाठी तक्रारदारांनीच पुढे यावे. अशी मागणी होऊ लागलेली आहे.
