प्रतिनिधी – संत रोहिदास सेवा मंडळ,काळा किल्ला,धारावी व पांडुरंग प्रतिष्ठान आयोजित संत रोहिदास दिंडी क्र २४ चे सोमवार दि १७ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता. भारताचे प्रवेशद्वार गेट ऑफ इंडिया येथून पंढरपूर कडे प्रस्थान होणार आहे.दिंडीचे हे ४७ वे वर्ष असून मुंबईतील सर्व वारकरी बंधूनी,समाज बांधवांनी या दिंडी सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष बबनराव घोलप,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खा.राहुल शेवाळे, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड,मनसेचे नेते बाळा नांदगावकर,डॉ शांताराम कारंडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.असे दिंडी चालक ह.भ.प. नारायण पाटील महाराज व दिंडीचे संतसेवक वारकरी भूषण ह.भ.प.चंद्रकांत कारंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
