Sunday, April 20, 2025
घरमहाराष्ट्रशिराळा खुनाचे गूढ उकळले भाच्याने मामाला संपवले; खुनाचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी

शिराळा खुनाचे गूढ उकळले भाच्याने मामाला संपवले; खुनाचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी

प्रतिनिधी  : शिराळ्यात आढळलेल्या बेवारस खूनाचे गूढ केवळ प्रवासी बॅगेवरून उकलण्यात सांगली पोलिसांना यश आलं आहे. या खूनप्रकरणी मृताची पत्नी, मुलगीसह तिघांना पोलीसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार बैठकीत दिली. खून झालेली व्यक्ती राजेश वसंतराव जाधव (वय ५३ रा.पलूस) असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून त्याचा फेब्रुवारी २०२४ मध्ये नॉयलॉन दोरीने गळा आवळून खून करून प्रेत प्रवासी बॅगेत ठेवून शिराळ्यात पूलाखाली टाकण्यात आले होते. या प्रकरणी मृताची पत्नी शोभा जाधव, मुलगी साक्षी जाधव (रा. पलूस) आणि नातेवाईक देवराज उर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे (वय २४ रा. शेवाळेवाडी, कराड) या तिघांना अटक करण्यात आली आहे. मृत जाधव हा कोणताही कामधंदा न करता दारू पिउन पत्नीवर संशय घेउन मारहाण करत होता. यामुळे या तिघांनी खून केल्याची कबुली दिली असल्याचे अधिक्षक घुगे यांनी सांगितले.     

शिराळ्यातील बाह्यवळण रस्त्यावरील पूलाखाली २० मे रोजी दुर्गंधी सुटल्याने पाहणी केली असता सतरंजीत गुंडाळलेले सडलेली मानवी प्रेत प्रवासी बॅगमध्ये आढळले होते. प्रेत पूर्णपणे कुजलेले असल्याने स्त्री की पुरूष याचीही ओळख करता येत नव्हती. केवळ प्रेत ठेवलेल्या प्रवासी बॅगेवरून पोलिसांनी संशयितांचा माग काढला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणी प्रवासी बॅग तयार करणार्‍याकडे चौकशी केली. यावेळी पलूसमध्ये अशी बॅग दिल्याचे समजल्यानंतर बॅग विक्रेत्याकडे चौकशी केली असता शेवाळेनं बॅग नेल्याचे समजले. चौकशी केली असता पोलिसांना या खूनाचा छडा लावण्यात यश आले.

प्रवासी बॅगेत सडलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला 
मृताची कोणतीही ओळख पटत नसताना पोलीसांनी आव्हान स्वीकारून पाच वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून या खूनाची उकल केवळ दहा दिवसात केली असून या पथकातील सर्व सहभागी पोलीस कर्मचार्‍यांना बक्षिस जाहीर करण्यात येत असल्याचे अधिक्षक घुगे यांनी सांगितले. उपधीक्षक मंगेश चव्हाण व सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सतीश शिंदे, शिराळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सिध्देश्‍वर जंगम यांच्या पथकांनी या खूनाची उकल केली.

शिराळा येथील बायपास रस्त्यावर असणाऱ्या एका पुलाखाली प्रवासी बॅगेत सडलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. प्रवासी बॅगेत बांधून टाकण्यात आलेला मृतदेह हा सडला होता. या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसासमोर निर्माण झाले होते. पोलिसांनी प्रवासी बॅगेचा धागा धरत त्याची निर्मिती कोठे झाली, आणि विक्री कोठे झाली. याची चौकशी करत पोलीस संशयीता पर्यंत पोहोचले. त्यानंतर या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. 

दरम्यान, राजेश जाधव यांचा तीन महिन्यापूर्वी म्हणजे 21 फेब्रुवारी खून करण्यात आला होता. तब्बल तीन महिने मृतदेह हा प्रवासी बॅगेतच होता. अशी धक्कादायक बाब देखील आता समोर आलीय. राजेश जाधव याला दारूचे व्यसन होते. त्यातूनच तो पत्नीला वारंवार मारहाण करून तिच्यावर संशय घेत होता. याच कारणातून त्याचा खून केला असल्याची कबुली आता तिघांनीही पोलिसांसमोर दिली. 

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments