Tuesday, April 29, 2025
घरमहाराष्ट्रओबीसी संत्रे कुटूंबाला न्याय मिळवून देणारच..! मा. ना. वडेट्टीवारांची पत्रकार परिषद

ओबीसी संत्रे कुटूंबाला न्याय मिळवून देणारच..! मा. ना. वडेट्टीवारांची पत्रकार परिषद

प्रतिनिधी : जालना जिल्ह्य़ातील जवखेडा येथील ओबीसी कुंभार कुटूंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची माहिती घेण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व ओबीसी नेते प्रा श्रावण देवरे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर जालना येथे पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना सत्तेचा माज चढलेला आहे. गरीब कुटुंबांची जमीन बळकावण्यासाठी त्यांनी अनेकांची घरे उध्वस्त केली आहेत. संत्रे कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित करु, असे स्पष्ट अभिवचन वडेट्टीवार यांनी दिले.

या प्रसंगी ओबीसी नेते प्रा श्रावण देवरे यांनी इशारा दिला की, संत्रे कुटूंबाला नुकसान भरपाई मिळावी व त्याच जागेवर त्याचे पुनर्वसन करण्यात यावे, अन्यथा सत्तेचा माज चढलेल्या धन-दांडग्यांना व जात-दांडग्यांना पुढील निवडणूकीत धडा शिकविल्याशिवाय हा ओबीसी आता शांत बसणार नाही.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments