महाराष्ट्राचे पर्यावरण प्रेमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ३० तारखेपर्यंत दरेगाव च्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान इको फ्रेंडली लाईफ चे संस्थापक अध्यक्ष सर श्री अशोक एन. जे. यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या महाबळेश्वर येथील दरेगाव या ठिकाणी असलेल्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत
५ जून २०२४ या जागतिक पर्यावरण दिनापासून इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशन ने देशभरात ७०० कोटी फळझाडे लावण्याचा निर्धार केला असून इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सर श्री. अशोक एन. जे. यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदर कृती कार्यक्रमाची पुस्तिका दिली आणि या कृती कार्यक्रमाची सुरवात ठाण्याच्या मुरबाड तालूक्यातून करण्यात येणार असून मुरबाड तालुक्यातील म्हसा गावात १०००० फळ झाडे लावून त्या गावाचे आदर्श मॉडेल संपूर्ण देशापुढे ठेवण्यात येईल असे सर श्री. अशोक एन. जे. यांनी सांगितले असता पर्यावरण प्रेमी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कृती कार्यक्रमात सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त करून ठाण्यात १० लाख झाडे लावण्यात यावी असा मानस असल्याचे व्यक्त केले. तसेच साताऱ्यात किती झाडे लावण्यात येतील अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारणा केली असता ७ लाख फळ झाडांचे बिजरोपण साताऱ्यात केले जाईल असे इको फ्रेंडली लाइफ चे संस्थापक अध्यक्ष सर श्री. अशोक एन. जे. यांनी ग्वाही दिली.
वाढत्या तापमानाच्या विळख्यातून देशाला वाचवायचे असेल आणि संपूर्ण फळ झाडानी बहरलेल्या समृद्ध भारताची निर्मिती करण्याकरिता एकच विचार, एकच लक्ष्य! भारतभर ७०० कोटी वृक्ष! इको फ्रेंडली लाईफच्या या विचारांचे आणि कृती कार्यक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरभरून कौतुक केले. तसेच शासन आपणा सोबत असल्याचे सांगून ५ जून या पर्यावरण दिनी मुरबाड येथील म्हसा या गावी ७०० कोटी फळ झाडे लावण्याच्या शुभारंभा करिता मुरबाड येथे हजर राहण्याचे आश्वासन दिले. दरम्यान सर श्री. अशोक एन. जे.यांच्यासोबत त्यांच्या इको फ्रेंडली लाईफ या संस्थेचे महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे प्रमुख पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते त्यात ठाण्यातून कुणाल बागुल, किशोर बनकर, तसेच नवी मुंबईतून सागर झेंडे आणि मुंबईतून राहुल गायकवाड हे पर्यावरण प्रेमी प्रामुख्याने उपस्थित असल्याचे दिसून आले.
