मुंबई – पुण्यातील पोर्शे कार प्रकरण आणि नागपूर अपघात प्रकरण ताजे असतानाच राज्याची आर्थिक राजधानी मुंबईतही एक धक्कादायक घटना घडलीय. सायन रुग्णालयात बेदारपणे गाडी चालवणाऱ्या अश्याच एका चालकाने वृद्ध महिलेला धडक दिलीय. या घटनेत महिलेने अपघातानंतर जागीच जीव सोडला अशी माहिती समोर येत आहे. मृत महिलेची अद्याप पोलिसांना ओळख पटली नसल्याने पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
मुंबईस्थित असलेले लोकमान्य टिळक म्यूनसिपल रुग्णालय परिसरात हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी उशिरा रात्री घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. रुग्णालयातील अधिकृत माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार रुग्णालय परिसरातील भरधाव कारने महिलेला धडक दिली त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असे समोर येत आहे.
पुण्यातील प्रकरणा प्रमाणेच नागपूरातही एका मद्यधुंद चालकाने रात्री ८.३० च्या दरम्यान तीन जणांना धडक दिली. या अपघातात महिला तिचे तीन महिन्याचे तान्हे बाळ आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. लहान बाळाची परिस्थिती नाजूक असल्याची बातमी समोर येते.
पुणे प्रकरणात माझं बारकाईने लक्ष, कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवला जातोय; अजित दादा बोलले
नागपूरातील झेंडा चौकात ही घटना घडलीय. या अपघातातील दोषी कार चालकांसह अन्य दोघेही नशेत असल्याचे समोर आले, तर गाडीत दारुच्या बॉटल आणि काही अमंली पदार्थ पोलिसांनी सापडले आहेत. पोलिसांकडून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.