प्रतिनिधी : मुंबई – सातारा कराड,कोल्हापूर असा ये जा प्रवास करणारे एस टी महामंडळ प्रवाशी यांना एस टी चे वाहक-चालक हे सकाळी अल्पोहर,दुपारी जेवण व रात्री जेवणासाठी प्रवाशांची बस शिरवळ जवळ कापूर ओहळ याठिकाणी थांबवत असतात.मात्र येथील हॉटेल मालक पैसे कमावण्याच्या नादात प्रवाशांची लूट करत आहे.निकृष्ट दर्जाचे सर्व पदार्थ देऊन निव्वळ पैसे कमावणे या उद्देशाने व्यवसाय करत आहे.भरमसाठ पैसे घेतले तर त्या दर्जाचे पदार्थ ग्राहकांना द्यायला हवे,मात्र येथे कोणताही पदार्थ घेतला तर तो पूर्ण निकृष्ट दर्जाचा पाहायला मिळतो,शिळे पाव, उसळ-मिसळ नुसते पाणी कोणत्याही पद्धतीची चव नाही,पोहे सुद्धा जास्त दरात देऊन ते सुद्धा अचविष्ठ बघायला मिळतात.ग्राहकांनी येथे काहीच खाऊ नये असे पदार्थ विकले जात आहेत.एस टी प्रवास करत असाल तर चालकाला याठिकाणी गाडी थांबायला देऊ नये,प्रवाशांच्या मुळे चालक -वाहक यांना मोफत अन्न पदार्थ खायला देऊन ग्राहकांची प्रवाशांची मित्र लूट हे हॉटेल महाराजा करत आहे.
