सातारा(अजित जगताप) : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सातारा शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपतींची गादी निर्माण केली . साताऱ्यात राज्य चालवलेले होते . त्या छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या २७५ व्या जयंतीनिमित्त आज अनेक मावळ्यांनी सातारा नजीक क्षेत्र माहुली येथील कृष्णा कोयनेच्या संगमा नजीक त्यांच्या पवित्र समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन केले. अनेक मान्यवरांनी इतिहासात घडलेल्या छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कारकिर्दीची माहिती नव पिढीला दिली.
कृष्णा कोयनेचा संगम असलेल्या सातारा नजीकच्या नदीपात्रातील सीसंम लाकडावर उभे असलेल्या या समाधीच्या नऊ फूट खोल पाया खोदून हा दगडाचा चौथारा समाधी उभारण्यात आलेली आहे. या समाधी वर नदीपात्रात सापडलेली मूळ पिंड असून या ठिकाणी अनेक मावळे व इतिहास प्रेमी भेट देत आहेत. थोरले शाहू महाराज यांचा १८ मे १६८२ साली गांगवली तालुका माणगाव जिल्हा रायगड या ठिकाणी जन्म झाला होता. जन्मापासूनच मोगल बादशाह व औरंगजेबाच्या कब्जात ते होते. त्याबद्दल त्यांचे सुटका झाल्यानंतर त्यांनी १७०७ ते १५1 डिसेंबर १७४९ पर्यंत सलग ४२ वर्ष त्यांनी अखंड हिंदुस्थानावर अटकेपार झेंडा रोवला होता. साताऱ्यात हिंदवी स्वराज्याचे राज्य निर्माण केले होते. मराठा साम्राज्य पंतप्रधान पेशवे यांना याच गादी कडून कारभाराची वस्त्र प्रदान करण्यात येत होती. अशी इतिहासामध्ये नोंद आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील इतिहास प्रेमी व अभ्यासक व चित्रपट निर्माते शशिकांत पवार, धीरेंद्र राजपुरोहित, अजय जाधवराव, प्रशांत कुलकर्णी, पत्रकार विशाल कदम ,अजित जगताप व मान्यवरांनी दक्षिण काशी संबोधणाऱ्या तीर्थक्षेत्र माहुली या ठिकाणी नदीपात्रात असलेल्या थोरले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी जाऊन पुष्प अर्पण केले. तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सातारा नगरीची निर्मिती करणारे छत्रपती थोरले शाहू महाराज यांची जयंती भव्य दिव्य व्हावी. यासाठी सर्वसाधारण सातारकर बंधू-भगिनी व मावळ्यांनी मनापासून प्रयत्न करावा. खरं म्हणजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी गुरु मानलेले श्री कचेश्वर स्वामी महाराज ब्रह्म राजगुरू यांचे सुद्धा या ठिकाणी समाधी असून दोन्ही गुरु व शिष्य हे सध्या नदीकाठावरच आहेत. परंतु, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा. यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा व्हावा. अशी अपेक्षा अनेक साताऱ्यातील इतिहास प्रेमींनी केली आहे.
