Sunday, April 20, 2025
घरमहाराष्ट्रबृहन्मुंबई महानगरपालिका डी विभागातील सफाई कर्मचारी याच्या प्रामाणिकपणा बद्दल आयुक्त  यांच्याकडून सन्मान

बृहन्मुंबई महानगरपालिका डी विभागातील सफाई कर्मचारी याच्या प्रामाणिकपणा बद्दल आयुक्त  यांच्याकडून सन्मान

प्रतिनिधी : महापालिका डी विभागाच्या घकव्य खात्यातील सफाई कामगार सुनील काशिनाथ कुंभार  हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना १५ तोळे  सोने सापडले,

परंतु या सोन्याच्या दैस्त ऐवजावर न भुलता त्यांनी प्रामाणिक पणा दाखवून त्यांनी ते मिळालेले १५ तोळे सोने त्यांचे मुकादम बाळाराम भिकाजी जाधव यांच्या करवी ते पोलिस ठाण्यात जमा केले आहे,त्यांचा  मुकादम  बाळाराम भिखाजी जाधव यांना  सुध्दा सोन्याची भुरळ न येता त्यांनी सुध्दा या कामी प्रामाणिक पणा दाखवलेला आहे.

सध्या बाजार भावाच्या दराप्रमाणे  अंदाजे दहा लाखांचा हा सोन्याचा दस्तऐवज आहे.

आज काल एवढी किंमत असलेले सोनं कुणी ही सोडलं नसतं परंतु मनपा सफाई कर्मचारी याचा असलेला हा प्रामाणिकपणा मुंबई महानगर पालिकेची मान गर्वाने उंचावत आहे.

सफाई कामगाराच्या या प्रामाणिक पणामुळे त्यांचा तसेच त्यांचे मुकादम यांचा मनपा आयुक्त  श्री भुषण गगराणी तसेच अतिरिक्त आयुक्त श्री सुधाकर शिंदे यांनी सन्मानित केले व त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

तसेच मुंबई महापालिकेमधील २४ विभागातून  सुनील कु़भार व बाळाराम जाधव यांच्यावर कामगार, कर्मचारी तसेच अधिकारी वर्गांकडून अभिनंदनचा  वर्षाव होत आहे.

अशीच एक घटना १५/२० वर्षांपूर्वी सी-विभागमद्ये एका रहिवाशाचे सोन्याचे पंजाबी कडे तत्कालीन सफाई कामगार दिवंगत श्रीम.जानकी लक्ष्मण सावंत, (मिळंदकर) यांनी  जमा केलेल्या कचर्याच्या पुंजा मध्ये सापडले होते, परंतु ते सोन्याचे नाही असे समजून  ते मुकादम यांनी तपासून त्यांच्या टेबलाच्या ड्रावर मध्ये ठेवले होते, एक दिड महिन्यानंतर त्या स्थानिक रहिवाशानी सफाई कामगार श्रीम.जानकी लक्ष्मण सावंत यांच्याकडे विचारणा केली असता जानकी सावंत निरुत्तर झाली, परंतु ते कडे ज्या मुकादमाकडे दिले होते त्याची विचारणा केल्यावर ते अनेक दिवस ड्रावरमध्ये पडलेले कडे जानकी सावंत यांच्या हाती लागताच तात्काळ ज्याचे होते ते त्यांच्या कडे सुपुर्त केले,या प्रामाणिक पणामुळे श्रीमती जानकी सावंत यांना ५००/- रु.कडेमालकांनी बक्षीस देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला होता.असे बरेच कामगार, कर्मचारी अधिकारी प्रामाणिक कर्तव्यपासून दुर्लक्षित आहेत.अशी कामगार वर्गात चर्चा ऐकायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments