प्रतिनिधी : भारत सरकारने काल १६ मे ला हृदय आणि यकृत यांसारख्या अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

साखर, वेदना, हृदय, यकृत, संसर्ग, ऍलर्जी, मल्टीविटामिन, अँटासिड, अँटीबायोटिक्ससह 41 औषधांचा समावेश असलेल्या 41 औषधांचे आणि 6 फॉर्म्युलेशनचे दर सरकारने निश्चित केले आहेत.
नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या काल झालेल्या 143 व्या बैठकीत औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राजपत्रात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.
तसेच कंपन्यांना ही माहिती डीलर्सला तातडीने देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. औषध कंपन्या ग्राहकांकडून औषधाच्या किंमतीव्यतिरिक्त फक्त जीएसटी आकारू शकतात, असेही सरकारी निर्देशांमध्ये म्हटले आहे.
औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एनपीपीएच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.