Wednesday, November 12, 2025
घरमहाराष्ट्रझायनोवा शाल्बी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित वैद्यकिय परिषदेला उत्तम प्रतिसाद

झायनोवा शाल्बी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित वैद्यकिय परिषदेला उत्तम प्रतिसाद

मुंबई : झायनोवा शाल्बी हॉस्पिटलने “झायनोवा शाल्बी कनेक्ट २.०” या वैद्यकिय परिषदेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये संसर्गजन्य रोग, कर्करोग, ऑर्थोपेडिक्स, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी आणि हृदयविकार अशा विविध शाखेतील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये१०० हून प्रसिध्द डॉक्टर्स, कॉर्पोरेट प्रतिनिधी, नव्या तंत्रज्ञानाचा शोध घेणारे संशोधक आणि आरोग्यसेवेतील व्यावसायिक उपस्थित होते. याप्रसंगी नवीन कॅथ लॅबचाही शुभारंभ करण्यात आला.आधुनिक आरोग्यसेवा, नावीण्यपूर्ण आणि विकासाचे एकत्रीकरण ही या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती.यावेळी संसर्गजन्य रोगाचे व्यवस्थापन, आयसीयू संसर्ग, टी.बी. उपचारांमधील प्रगती ,फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान, केमोथेरपी आणि सांधे प्रत्यारोपण,न्यूरोसर्जरी, एपिलेप्सी, सीकेडी सर्व्हिलन्स, हाय-रिस्क ऑब्स्टेट्रिक्स, कोरोनरी अँजिओग्राफी, कार्डियाक सर्जरी आणि एंडोस्कोपी अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.डॉ. निमित नागदा, डॉ. नेहा पाटील, डॉ. रवींद्र ढोरे, डॉ. सुषमा रोकडे, डॉ. विश्वनाथन अय्यर, डॉ. महेश सिंग, डॉ. शिल्पा जोशी, डॉ. चेतन शाह, डॉ. जितेश देसाई आणि डॉ. मुकेश पारेख यांच्यासारखे तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते. प्रत्येक सत्रात उपस्थितांना विचारांची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आणि रुग्णांची सुरक्षितता, निदान आणि परिणाम सुधारणारे विकसित तंत्रज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोन अधोरेखित करण्यात आले.या परिषदेतंर्गत तज्ञांनी कार्डिओलॉजी, एंडोस्कोपी आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुरक्षित न्यूरोसर्जरी, सुधारित एपिलेप्सी केअर आणि प्रोअ‍ॅक्टिव्ह सीकेडी सर्व्हिलन्स यावर चर्चा केली.या परिषदेविषयी बोलताना झायनोवा शाल्बी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेनी वर्गीस सांगतात की, झायनोवा शाल्बी कनेक्ट २.० या परिषदेतंर्गत आरोग्यसेवेतील व्यावसायिक, नव्या तंत्रज्ञानांचा शोध घेणारे संशोधत आणि डॅाक्टरांना एकाच व्यासपीठाखाली एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला. या परिषदेच्या माध्यमातून आपली आरोग्यसेवा आणखी मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा