Sunday, November 2, 2025
घरमहाराष्ट्रमतदारयादीतील बोगस मतदार आणि मतचोरीविरोधात ‘सत्याचा मोर्चा’; महाविकास आघाडी व मनसे एकत्र

मतदारयादीतील बोगस मतदार आणि मतचोरीविरोधात ‘सत्याचा मोर्चा’; महाविकास आघाडी व मनसे एकत्र

मुंबई : आज १ नोव्हेंबर रोजी मतदारयाद्यांमधील बोगस मतदार आणि मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेकडून ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीतील सर्व प्रमुख नेते एकत्र आले होते.मोर्चाच्या प्रारंभी सर्वच नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि लोकशाही टिकवण्याची गरज अधोरेखित केली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले,
“तुम्ही सर्वांनी जबरदस्त एकजूट दाखवली आहे. अशीच अडचण १९७९ च्या काळात आली होती. त्या वेळी आम्ही महाविद्यालयात शिकत होतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोक मोठ्या संख्येने उतरले होते. आजचा हा मोर्चा पाहून त्या काळाची आठवण झाली. संविधानाने दिलेला अधिकार जपण्याची वेळ आज आली आहे.”ते पुढे म्हणाले, “सत्तेचा गैरवापर केला जातोय. अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. निवडणुकीनंतर जे प्रकार समोर आले, त्यावर जाणकारांनी योग्य लक्ष वेधले. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. शासनाने जबाबदारीने वागावे, आणि नागरिकांनीही लोकशाही टिकवण्याची खबरदारी घ्यावी.या मोर्चामुळे मुंबईतील वातावरण चांगलेच तापले असून, विरोधकांनी निवडणूक आयोगावर कठोर टीका केली आहे. ‘सत्याचा मोर्चा’ हा लोकशाही व पारदर्शक निवडणुकीसाठीचा संघर्ष असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments