प्रतिनिधी : मुंबईत आज अवकाळी पावसामुळे श्रीजी टॉवर, जनरल अरुण कुमार वैद्य, बरकत अली नाका येथे नुकत्याच झालेल्या वादळामुळे बिल्डिंगचे पार्किंग स्लॅब कोसळले, किमान १५ ते २० गाड्या ढिगाऱ्याखाली अडकल्या.. अशा प्रसंगी दक्षिण मध्य लोकसभेचे महाविकास आघाडी-शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अनिल देसाई प्रसंगाचे गांभीर्य ओळखुन, सामाजिक बांधीलकीचे भान राखून, आपला प्रचार थांबवून तातडीने घटना स्थळी पोहचले. घटनाग्रस्त नागरिकांची विचारपूस केली तसेच संबंधित आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधून तातडीने मदत देण्याची सूचना दिली.
